---Advertisement---

भारत, पाकिस्तानसह ‘असे’ आहेत अंडर-१९ विश्वचषकासाठीचे सर्व संघ, वाचा एका क्लिकवर

U19-World-Cup-Trophy
---Advertisement---

पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात आयसीसीने १९ वर्षांखालील विश्वचषकाचे (under 19 world cup 2022) आयोजन केले आहे. २०२२ मध्ये होणाऱ्या या विश्वचषकासाठी अनेक देशांनी त्यांचे संघ घोषित करायला सुरुवात केली आहे. बीसीसीसीने देखील आगामी विश्वचषकासाठी भारताच्या १९ वर्षाखालील संघाची घोषणा केली आहे. आता इंग्लंडनेही (england u19 squad) विश्वचषकासाठी त्यांच्या १९ वर्षांखालील संघाची घोषणा केली आहे. आयसीसीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर घोषित झालेल्या संघांची माहिती दिली आहे.

आगामी आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक वेस्ट इंडीजमध्ये आयोजित केला जाणार आहे. विश्वचषकात एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. यांमधील भारत आणि इंग्लंड व्यतिरिक्त इतरही संघांची घोषणा करण्यात आली आहे. १९ वर्षाखालील विश्वचषकात एकूण ४८ सामने खेळले जातील. विश्वचषकाचा पहिला सामना १४ जानेवारीला खेळला जाईल, तर अंतिम सामना ५ फेब्रुवारीला होईल.

इंग्लंड –
टॉम प्रेस्ट (कर्णधार), रेहान अहमद, टॉम एस्पिनवॉल, सनी बॅकर, नाथन बॅर्नवॉल, जॉर्ज बेल, जॅकब बेथल, जोश बॉयडेन, जेम्स कोल्स, एलेक्स हॉर्टन, विल लक्सटन, जेम्स रेव, जेम्स सेल्स, फ़तेह सिंह, जॉर्ज थॉमस.
राखीव खेळाडू – जोश बॅकर, बेन क्लिफ

भारत
यश ढुल (कर्णधार), हरनूर सिंह, अंगक्रिश रघुवंशी, एसके रशीद (उपकर्णधार), निशांत सिंधु, सिद्धार्थ यादव, अनीश्वर गौतम, दिनेश बाना, आराध्य यादव (यष्टीरक्षक), राज अंगद बाव, मानव पारखी, कौशल तांबे, आरएस हैंगरगेकर, वासु वत्सो, विक्की ओस्तवाल, रवि कुमार, गर्व सांगवान
राखीव खेळाडू -रिषीत रेड्डी, उदय सराहन, अंश गोसाई, अमृत राज उपाध्याय.

अफगाणिस्तान
सुलीमान साफी (कर्णधार), इजाज अहमदझाई (उपकर्णधार), मोहम्मद इशाक (यष्टीरक्षक) सुलीमान अरबझाई, बिलाल सईदी, अल्लाह नूर, मुहम्मदउल्ला, खैबर वली, इजाज अहमद, इझारुलहक नावीद, नूर अहमद, फैसल खान, नवीद झदरन, बिलाल सामी, नांगलई खान, खलील अहमद, अब्दुल हादी, बिलाल तारीन, शाहिद हसनी आणि युनूस.

ऑस्ट्रेलिया
हरकिरत बाजवा, एडन काहिल, कूपर कोनोली, जोशुआ गार्नर, आयझॅक हिगिन्स, कॅम्पबेल केलवे, कोरी मिलर, जॅक निस्बेट, निवेथन राधाकृष्णन, विल्यम साल्झमन, लचलान शॉ, जॅक्सन सिनफिल्ड, टोबियास स्नेल, टॉम व्हिटनी, टीग विली.
ऑस्ट्रेलियाचे राखीव खेळाडू: लियाम ब्लॅकफोर्ड, लियाम डॉडरेल, जोएल डेव्हिस, सॅम राहाले, ऑब्रे स्टॉकडेल.

बांगलादेश
रकीबुल हसन (कर्णधार), प्रँतिक नवरोज नबिल (उपकर्णधार), महफिजुल इस्लाम, इफ्ताखार हुसेन इफ्ती, एसएम मेहेरोब हसन, आइच मोल्ला, अब्दुल्ला अल मामून, गाझी मोहम्मद ताहजीबुल इस्लाम, अरिफुल इस्लाम, मो. फहीम, मोहम्मद मुस्फिक हसन, रिपन मंडोल, मो. आशिकुर जमान, तनझिम हसन साकिब, नैमूर रोहमन नोयॉन.
राखीव खेळाडू: अहोसून हबीब लिओन, जिशान आलम.

आयर्लंड
टिम टेक्टर (कर्णधार), डायरमुइड बर्क, जोशुआ कॉक्स, जॅक डिक्सन, लियाम डोहर्टी, जेमी फोर्ब्स, डॅनियल फोर्किन, मॅथ्यू हम्फ्रेस, फिलिप ले रौक्स, स्कॉट मॅकबेथ, नॅथन मॅकगुयर, मुझामिल शेरझाड, डेव्हिड व्हिन्सेंट, ल्यूक व्हेलन, रूबेन विल्सन.
राखीव खेळाडू: रॉबी मिलर, रायन हंटर, इवान विल्सन.

पाकिस्तान
कासिम अक्रम (कर्णधार), अब्दुल फसीह, अब्दुल वाहिद बंगलझाई, अहमद खान, अली असफंद, अरहम नवाब, अवैस अली, फैसल अक्रम, हसीबुल्ला, इरफान खान नियाझी, माझ सदाकत, मेहरान मुमताज, मोहम्मद शेहजाद, रिजवान मेहमूद, जीशान जमीर.
राखीव खेळाडू: गाझी घोरी, मोहम्मद झीशान.

कॅनडा
मिहीर पटेल(कर्णधार), अनूप चिमा, अर्जुन सुखू, एथन गिब्सन, गेविन निब्लॉक, गुरनेक जोहल सिंग, हरजप सैनी, जश शाह, कैरव शर्मा, मोहित प्रशार, परमवीर खरौद, साहिल बदीन, शील पटेल, सिद्ध लाड, यासिर महमूद
राखीव खेळाडू: आयुष सिंग, एरन मालिदुवापाथीराना, रमणवीर धालीवाल, यश मोंडकर.

पापुआ न्यू गिनी
बर्नबास महा(कर्णधार), बोयो रे, सिगो केली, माल्कम अपोरो, तोआ बोए, रायन अनी, एउ ओरू, कातेनालाकी सिंगी, क्रिस्टोफर किलापट, ज्युनियर मोरिया, पीटर करोहो, पॅट्रिक नू, रसन केवौ, करोहो केवौ, जॉन कारिको.
राखीव खेळाडू: वेले कारिको, गाता मिका, अपी इला.

दक्षिण आफ्रिका
जॉर्ज व्हॅन हेर्डन (कर्णधार), लियाम अल्डर, मॅथ्यू बोस्ट, डेवाल्ड ब्रेव्हिस, मायकेल कोपलँड, इथन कनिंगहॅम, व्हॅलेंटाईन किटाईम, क्वेना माफाका, गेरहार्ड मारी, ऍफिवे मन्यांडा, अँडिले सिमेलेन, जेड स्मिथ, केडेन सोलोमन्स, जोशुआ स्टीफनसन, असाखे त्शाका.
राखीव खेळाडू: हार्डस कोएत्झर, रोनन हरमन, कॅलेब सेलेका.

युगांडा
पास्कल मुरुंगी(कर्णधार), मुनीर इस्माईल (उपकर्णधार), अक्रम सुबुगा, ख्रिस्तोफर किडेगा, पायस ओलोका, जोसेफ बागुमा, मॅथ्यू मुसिंगुझी, रोनाल्ड ओमारा, सायरस काकुरू, असाबा ब्रायन, इसाक सान्यु एटेगेका, रोनाल्ड ओपिओ, रोनाल्ड लुटाया, एडविन नुगाबा, एडविन नुवा मियागी.

वेस्ट इंडिज
अक्कीम ऑगस्टे (कर्णधार), जिओव्होंटे डेपेइझा (उपकर्णधार), ओनाजे अमोरी, टेडी बिशप, कार्लन बोवेन-टकेट, जेडेन कार्माइकल, मॅककेनी क्लार्क, रिवाल्डो क्लार्क, जॉर्डन जॉन्सन, जोहान लेन, अँडरसन महासे मॅथ्यू नंदू, शककेर पॅरिस, शिवाई, इ. थॉर्न.
राखीव खेळाडू: अँडरसन अमुर्डन, नॅथन एडवर्ड, अँडेल गॉर्डन, वसंत सिंग, केविन विकहॅम.

हेही वाचा- अंडर १९ विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, कौशल तांबेसह महाराष्ट्राच्या ‘या’ ३ शिलेदाराचाही संघात समावेश

१९ वर्षाखालील विश्वचषकात कोरोनाचा धोका लक्षात घेऊन इंग्लंड संघांनी काही राखीव खेळाडू सामील केले आहेत. भारतीय संघानेही काही खेळाडू राखीव ठेवले आहेत.

विश्वचषकाचे आयोजन वेस्ट इंडीजमध्ये केले जाणार आहे आणि त्याठिकाणच्या परिस्थितीत विजय मिळवणे इतर संघासाठी मोठे आव्हान असणार आहे. विश्वचषकात खेळणाऱ्या १६ संघांना चार ग्रुपमध्ये विभागले गेले आहे. भारत ज्या ग्रुपमध्ये आहे, त्यामध्ये ऑयर्लंड, युगांडा आणि दक्षिण अफ्रिका संघाचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या –

जशी आहेस, तशीच राहा..! बड्डेदिनी रोहित शर्माच्या पत्नी रितिकाला प्रेमळ शुभेच्छा

तो येथील परिस्थितीत घातक ठरेल; द. आफ्रिकेच्या कर्णधाराला वाटतेय भारताच्या ‘या’ गोलंदाजाची भीती

‘हे’ आहेत वर्ष २०२१ चे टॉप-१० टी२० फलंदाज, यादीत पाकिस्तानींचा बोलबाला; तर एकही नाही भारतीय

व्हिडिओ पाहा –

युवी अन् भज्जीमुळं भर टीम मीटिंगमध्येच रडला दादा |When Yuvraj’s Prank Made Ganguly Cry

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---