भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. साउथॅम्प्टनच्या द रोज बाउल स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या सामन्याला १८ जूनपासून सुरुवात झाली आहे. परंतु पहिल्या दिवशी जोरदार पाऊस पडल्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला होता. तर दुसऱ्या दिवशी न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून, भारतीय संघाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. या डावात, भारतीय संघाची भिंत म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा पूर्णपणे फ्लॉप ठरला.
यानंतर आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो निराशाजनक प्रदर्शन करत राहिला. तर हा इंग्लंड दौरा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा दौरा ठरू शकतो.
पहिल्या डावात फलंदाजी करत असताना, रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. दोघांनी मिळून ६२ धावा जोडल्या होत्या. परंतु रोहित शर्मा ३४ धावा करत माघारी परतला होता. त्यानंतर मैदानात आलेल्या चेतेश्वर पुजाराकडून अनेकांनी अपेक्षा व्यक्त केली होती की, तो या डावात मोठी खेळी करेल. परंतु तो अवघ्या ८ धावा करत माघारी परतला होता. ट्रेंट बोल्टने त्याला पायचीत करत माघारी धाडले होते. मुख्य बाब म्हणजे त्याने ३६ व्या चेंडूवर आपले खाते उघडले होते. त्यामुळे त्याला ट्रोल देखील केले जात आहे. (England tour may be the last chance for Cheteshwar pujara)
दोन वर्षात केल्या आहेत अवघ्या ८१८ धावा
भारतीय कसोटी संघाची भक्कम भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराला गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. ऑगस्ट २०१९ पासून त्याने एकूण १८ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला २९.२१ च्या सरासरीने अवघ्या ८२६ धावा करण्यात यश आले आहे. यादरम्यान त्याला एकही शतक झळकावता आले नाहीये. २९ डावात त्याला फक्त ९ वेळा ५० धावांचा पल्ला गाठण्यास यश आले आहे.
चेतेश्वर पुजाराची कारकिर्द
चेतेश्वर पुजाराने २०१० मध्ये ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण ८५ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याला ६२४४ धावा करण्यात यश आले आहे. यामध्ये त्याने १८ शतक आणि २९ अर्धशतक झळकावले आहेत. तसेच २०६ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. येत्या काही दिवसातच इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत तो चांगली कामगिरी करण्यास अपयशी ठरला, तर त्याला भारतीय कसोटी संघातून कायमचे स्थान गमवावे लागू शकते.
महत्वाच्या बातम्या-
पिछाडीवर असलेली विराटसेना अंतिम सामन्यात कशी करू शकते पुनरागमन? माजी खेळाडूने दिला ‘कानमंत्र’
भावा, कुठे स्विमिंग पुलमध्ये होणार का सामना? ‘ते’ ट्वीट करत भज्जी नेटिझन्सकडून झाला ट्रोल
WTC अंतिम सामना अनिर्णीत राहिल्यास भारताचा मोठा तोटा तर न्यूझीलंड फायद्यात; बघा कसं?