मुंबई । इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेच्या तिसर्या सामन्यात इंग्लिश खेळाडूंनी जबरदस्त पुनरागमन करत कॅरेबियन संघाला बॅकफूटवर ढकलले.1982 नंतर प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याची संधी वेस्ट इंडीज संघाला असताना इंग्लंडचा संघ कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा वर्चस्व गाजविण्यासाठी सज्ज झाला आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम इंग्लंडला फलंदाजीस पाचारण केले. इंग्लंडने पहिल्या डावात 369 धावा केल्या.
त्याचवेळी कॅरेबियन संघाला डावाची चांगली सुरुवात करता आली नाही आणि दुसर्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांनी 6 गडी गमावून 137 धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक गोलंदाजी करत प्रत्येकी 2-2 गडी बाद केले. यासह जेम्स अँडरसनने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
जेम्स अँडरसन वेस्ट इंडिजविरुद्ध 2 बळी घेत कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे. जेम्स अँडरसनने वेस्ट इंडिजविरुद्ध 87 विकेट्स घेतल्या आहेत. शिवाय तो 5 देशांविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा इंग्लंडचा गोलंदाज ठरला आहे.
जेम्स अँडरसनने भारताविरुद्ध 110 विकेट्स, पाकिस्तानविरुद्ध 63, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 93, श्रीलंका विरुद्ध 52 आणि वेस्ट इंडीज विरूद्ध 87 विकेट्स घेतल्या आहेत. या देशांविरूद्ध इंग्लंडकडून या सर्वाधिक विकेट्स आहेत.
त्याचबरोबर, स्टुअर्ट ब्रॉडच्या नावाचाही या यादीत समावेश आहे, ज्यांनी आयर्लंडविरुद्ध 7 विकेट्स आणि न्यूझीलंडविरुद्ध 66 विकेट्स घेतल्या आहेत. इयान बोथमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक 148 बळी मिळविले आहेत, तर बांगलादेशविरुद्ध हॉगार्डने 23 तर गॉफने झिम्बाब्वेविरुद्ध 16 गडी बाद केले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे दुसर्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर वेस्ट इंडीज संघाने 6 गडी राखून 137 धावा केल्या आहेत. वेस्ट इंडीजचा संघ अद्याप 232 धावांनी पिछाडीवर आहे, तर फॉलोऑन वाचवण्यासाठी त्यांना आणखी 32 धावांची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–स्टीव्ह बकनरवर पठाण भडकला, बकनर तुम्ही चुका नाही केल्या तुम्ही तर..
–१४० किलो वजनाच्या वेस्टइंडीजच्या खेळाडूने पकडला अप्रतिम झेल, कॅप्टनही झाला अवाक्
–चीयरलीडर्स ते स्ट्रॅटेजिक टाईम आऊट, पहा काय काय होणार आयपीएल २०२०मध्ये बदल
–निराशाजनक! पदार्पणाच्या वनडे सामन्यातच नर्वस नाइंटिजचे शिकार झालेले ५ क्रिकेटपटू
–टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ३- गब्बरची कसोटी क्रिकेटमध्ये जबर एन्ट्री
–अगदी सौरव तिवारीपासून ‘या’ ६ कर्णधारांच्या अंडर खेळलाय धोनी