कसोटी कारकिर्दीतील आपला १००वा सामना खेळत असलेल्या जो रूट याने भारतीय संघाविरुद्ध पहिल्या इनिंग मध्ये शतक झळकावले आहे. पहिल्या दिवसअखेर इंग्लंड संघाने ३ बाद २६३ इतक्या धावा केल्या आहेत. तसेच कर्णधार जो रूट १२८ धावांवर फलंदाजी करत आहे.
आजच्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर शतकवीर जो रूटने इंग्लंड संघ ६०० ते ७०० धावा पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार असल्याचे विधान केले आहे. खेळपट्टीवर पायाचे निशाण उमटायला सुरुवात झाली आहे, असे तो म्हणाला. त्याने पुढे म्हंटले की, “जर आम्ही उद्या पूर्ण दिवस आणि तिसऱ्या दिवशी फलंदाजी करण्यास आम्हाला यश आले तर आम्ही यशस्वी होऊ शकतो. त्यावेळी काय होईल हे सांगता येणार नाही. पण आम्ही नक्की प्रयत्न करू.”
“७०० धावांचे लक्ष्य”
दिवसाचा खेळ संपल्यानंतर खेळपट्टीबाबत बोलताना जो रूट म्हणाला, “आम्हाला पहावं लागेल आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा विचार आम्ही करू. आम्हाला ६०० -७०० धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल. पहिल्या इनिंग मध्ये जास्तीत जास्त धावा करणे आवश्यक आहे. जर आम्ही उद्या पूर्ण दिवस आणि तिसऱ्या दिवशी फलंदाजी करण्यास यशस्वी झालो तर आमच्यासाठी उत्तम आहे.’
रूटची श्रीलंका दौऱ्यावर उत्तम कामगिरी
इंग्लंड संघाने श्रीलंकन संघाला कसोटी मालिकेत त्यांच्याच धरतीवर जाऊन पराभूत केले आहे. यात कर्णधार जो रूट याने उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. इंग्लंड संघाची रोटेशन पॉलिसी सुरू आहे.आणि महत्वाची बाब म्हणजे जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स हे संघात परतले आहे. यामुळे इंग्लंड संघ आणखीन मजबूत झाला आहे असे म्हणायला काही वावग ठरणार नाही.
जो रूट शेवटी म्हणाला, “आमच्यासाठी खरंच ही चांगलीच सुरुवात आहे आणि या गोष्टीचा आम्ही फायदा घ्यायला हवा. आम्हाला अशा परिस्थितीमध्ये खूप वेळ फलंदाजी करावीच लागेल.”
महत्वाच्या बातम्या:
आयपीएल 2021 साठीच्या लिलावात सहभागी होणार अर्जुन तेंडुलकर, इतकी असेल बेस प्राईस
मेरा नाम है वॉशिंग्टन, रिषभ पंतने भर मैदानात रचले नवीन गाणे, पाहा भन्नाट व्हिडिओ
BAN vs WI : मेहदी हसनची अष्टपैलू कामगिरी, पहिल्या कसोटीवर बांग्लादेशची मजबूत पकड





