लंडन| इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारपासून (१२ ऑगस्ट) मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. तत्पूर्वी पावसामुळे नाणेफेकीस २० मिनिचांचा विलंब झाला. मात्र भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.२० वाजता नाणेफेक झाली आहे. नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या पारड्यात गेला असून कर्णधार जो रुटने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी उभय संघात जास्त बदल करण्यात आले नाहीत. भारतीय संघात केवळ १ बदल असून अष्टपैलू शार्दुल ठाकूरच्या जागी इशांत शर्माला संधी देण्यात आली आहे. शार्दुलला दुखापत असल्यामुळे तो या सामन्यासाठी अनुपल्बध असेल. तर इंग्लंड संघात ३ बदल करण्यात आले आहे. दुखापतग्रस्त स्टुअर्ट ब्रॉडच्या जागी मार्क वुडला सहभागी करण्यात आले आहे. तर झॅक क्राउलेच्या जागी हसीब हमीद आणि डॅनियल लॉरेन्सच्या जागी मोईन अली खेळणार आहे.
England have opted to bowl in the second #ENGvIND Test.
🏴: Moeen, Hameed and Wood come in for Lawrence, Crawley and Broad
🇮🇳: Ishant Sharma replaces Shardul Thakur#WTC23 | https://t.co/rhWT865o91 pic.twitter.com/L08E6h7GL7— ICC (@ICC) August 12, 2021
इंग्लंड संघ:
रॉरी बर्न्स, डॉमिनिक सिबली, हसीब हमीद, जो रूट (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जोस बटलर (यष्टीरक्षक), मोईन अली, सॅम करन, ओली रॉबिन्सन, मार्क वुड, जेम्स अँडरसन
भारत संघ:
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज