चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुबई येथे झालेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या अंतिम सामन्यात सीएसकेने केकेआरचा २७ धावांनी पराभव करत आयपीएलचे जेतेपद पटकावले. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचे हे चौथे आयपीएल जेतेपद आहे.
केकेआरने सामना गमावला असला, तरी कर्णधार ओएन मॉर्गनने संघाच्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. ओएन मॉर्गनने आपल्या संघाचे युवा खेळाडू व्यंकटेश अय्यर आणि शुभमन गिल यांचे कौतुक केले. उल्लेखनीय बाब म्हणजे, शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) खेळलेल्या अंतिम सामन्यात व्यंकटेश अय्यरने ५० आणि शुभमन गिलने ५१ धावा केल्या.
सामन्यानंतर मॉर्गन म्हणाला, ‘आमच्या संघाच्या खेळाडूंनी ज्या प्रकारे लढा दिला त्याचा आम्हाला अभिमान आहे. दुर्दैवाने आज आमचा दिवस नव्हता. व्यंकटेश अय्यर या स्पर्धेत नवीन आहेत, पण त्याचे भविष्य खूप मोठे आहे. तो आणि गिल आमच्या फलंदाजीचा पाया आहेत. या सामन्यात राहुल त्रिपाठीनी दाखवलेले धैर्य खूप आश्चर्यकारक होते. जखमी असून तो मैदानात उतरला.’
कोलकाता संघाने आयपीएल २०२१ मध्ये चांगली कामगिरी केली. संघाने युएईत झालेल्या दुसऱ्या टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी केली. केकेआरने प्लेऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्सला हरवून आयपीएलच्या १४ व्या हंगामाची अंतिम सामना गाठला होता.
आयपीएल २०२१ च्या अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी पराभव केला. १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआर २० षटकांत ९ गडी गमावून १६५ धावाच करू शकला. सीएसकेसाठी शार्दुल ठाकूरने तीन आणि रवींद्र जडेजाने दोन बळी घेतले.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २० षटकांत ३ गडी गमावून १९२ धावा केल्या होत्या. सीएसकेकडून फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक ८६ धावा केल्या. त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
‘जेव्हा- जेव्हा लोक म्हणतील की, त्याच्यात आता दम नाही…’, सलमान खानकडून ‘माही’चे कौतुक
बुढ्ढे में है दम! चाळीशीतही आयपीएलमध्ये ‘कॅप्टनकूल’ धोनीचाच बोलबाला
तब्बल १५ वर्षांनंतर भारत करणार पाकिस्तान दौरा? ‘या’ स्पर्धेदरम्यान दोन संघात बघायला मिळू शकतात सामने