सध्या सर्वत्र आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेची चर्चा सुरू आहे. सध्या या स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामने सुरू आहेत. तर येत्या २३ ऑक्टोबरपासून सुपर-१२ सामन्यांना प्रारंभ होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने येणार आहेत. या दोन्ही संघांना विजयासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गन याने मोठे वक्तव्य केले आहे.
इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार ओएन मॉर्गन याने यावर्षी झालेल्या ७ टी-२० सामन्यात १२ च्या सरासरीने अवघ्या ८२ धावा केल्या आहेत. यासह आयपीएल २०२१ स्पर्धेत देखील तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. बीबीसीने ओएन मॉर्गनने हवाल्यातून लिहिले की, “मला संघासाठी अडथळा निर्माण करायचा नाहीये. मी धावा जरी कमी केल्या असतील तर मी फलंदाजी चांगली केली आहे. इंग्लंड संघाचा पुढील सराव सराव सामना गुरुवारी (२१ ऑक्टोबर) रोजी न्यूझीलंड संघाविरुद्ध पार पडणार आहे. त्याचे स्पष्ट म्हणणे आहे की, जर त्याने चांगली फलंदाजी नाही केली तर तो स्वतःला संघाबाहेर करू शकतो.”
तसेच स्वतःला संघाबाहेर करण्याच्या प्रश्नावर उत्तर देत ओएन मॉर्गनने लिहिले की, “हा नेहमीच एक चांगला पर्याय राहिला आहे. हे प्रश्न विचारले जात आहेत कारण मी सध्या चांगली कामगिरी करत नाहीये. टी-२० क्रिकेटमध्ये तुम्हाला जोखीम घ्यावी लागते. मी आता या गोष्टीसाठी देखील तयार आहे.”
इंग्लंड संघाचा पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी वेस्ट इंडिज संघाविरुद्ध पार पडणार आहे. तसेच ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या स्पर्धेतील गेल्या ९ सामन्यात त्याला एकदाही १० पेक्षा अधिक धावा करता आल्या नव्हत्या. तरीही त्याने या स्पर्धेतील सर्व सामने खेळले होते.
इंग्लंड संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
ओएन मॉर्गन सध्या चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत असला तरी देखील तो इंग्लंड संघासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. त्याने १०७ सामन्यात २९ च्या सरासरीने २३६० धावा केल्या आहेत . या दरम्यान त्याने १४ अर्धशतक झळकावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
सचिनची विकेट गेल्यावर सेहवाग अंपायर शेजारी जाऊन बसला, असे काय घडले होते बेंगलोर कसोटीत?
माही जैसा कोई नहीं…! केएल राहुलने सांगितले एमएस धोनीचे ड्रेसिंग रूममध्ये असण्याचे महत्त्व
HBD विरू: तो आला..त्याने पाहिलं..अन् त्याने जिंकलं! भारतीय क्रिकेटचा खराखुरा ‘सुलतान’






