भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सध्या चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने भारताचा 8 विकेटने पराभव केला आहे. सामन्यातील सुरुवातीचे दोन दिवस चांगला खेळ केल्यानंतरही तिसऱ्याच दिवशी भारतीय संघ दुसऱ्या डावात केवळ 36 धावांवर बाद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने केवळ 2 गडी गमावत लक्ष पूर्ण केले.
भारतीय संघाच्या या निराशाजनक कामगिरीमुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. अशातच एका प्रेक्षकाने ट्विटरवर मजेशीर प्रश्न विचारत थेट अभिनेता सोनू सूदला मदतीची हाक दिली होती, यावर सोनू सूदने आपल्या उत्तरातून सर्व देशवासीयांची मने जिंकली आहेत.
कोरोना काळात सोनू सुदने परराज्यात अडकलेल्या नागरिकांना आपापल्या राज्यात पाठवण्यात मदत केली होती. त्याच्या या कृतीचे संपूर्ण देशभरातून कौतुक करण्यात आले होते.
दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या कामगिरीवर निराश असलेल्या एका चाहत्याने सोनूला ट्विटरवर संदेश दिला की, ‘सोनू सूदजी भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये अडकला आहे, तुम्ही भारतीय संघाला पुन्हा भारतात घेऊन येता का?.’
यावर सोनू सूदने उत्तर देत म्हटले ,’ भारतीय संघाला आणखी एक संधी मिळायला हवी, दुसऱ्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन संघालाच भारतात घेऊन येऊ.’ सोनुने अशाप्रकारे भारतीय क्रिकेट संघावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व क्रिकेट रसिकांनी त्याचे कौतुक केले आहे.
भारतीय टीम को एक मौक़ा और दें ।
अगले मैच में ऑस्ट्रेल्या टीम को घर लेकर आएँगे🏏 https://t.co/QwbqKJNFRH
— sonu sood (@SonuSood) December 19, 2020
दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना 26 डिसेंबर पासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वर होणार आहे. पालकत्व रजा घेवून भारतात परतलेल्या नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थित भारताचा स्टार बॅट्समन अजिंक्य रहाणे मालिकेतील उर्वरित सर्व सामन्यात भारताचे कर्णधारपद भूषवणार आहे. पहिल्या सामन्यातील पराभवाला विसरून भारतीय संघ अजिंक्यच्या नेतृत्वात नव्या जोशात मैदानात उतरेल अशी सर्वांना अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हॅप्पी बर्थडे डार्लिंग..! पत्नी रितिकाच्या वाढदिवसानिमित्त रोहितची सुपर’हिट’ पोस्ट
टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत पुनरागमन करणे कठीण, पाहा काय सांगते आकडेवारी
ऍडलेड कसोटी सामन्यात का घातले होते शमीने फाटलेले शूज? ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितले कारण
ट्रेंडिंग लेख –
मराठीत माहिती- क्रिकेटर के श्रीकांत
तीन भारतीय शिलेदार ज्यांनी कसोटीत सर्वात कमी डावात केल्या १००० धावा पूर्ण