लंडनच्या ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघातील फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत इंग्लंड संघावर ३६७ धावांची मोठी आघाडी घेत त्यांना विजयासाठी ३६८ धावांचे मोठे आव्हान दिले आहे. परंतु, भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे या सामन्यात एकही धाव न करत माघारी परतला.
ओव्हलच्या मैदानावर तिसऱ्यांदा अजिंक्य रहाणे एकही धाव न करता माघारी परतला आहे. ज्यामुळे सर्वच स्तरातून त्याच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान अजिंक्य रहाणेच्या फ्लॉप शो नंतर नेटकऱ्यांनी देखील मिम्स शेअर करत त्याला ट्रोल केले आहे.
अजिंक्य रहाणे गेल्या काही महिन्यांपासून चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत त्याने ७ डावात अवघ्या १०९ धावा केल्या आहेत. यादरम्यान ६१ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. यानंतर त्याला एकही मोठी खेळी खेळता आली नाही. ज्याचा परिणाम त्याच्या फलंदाजी सरासरीवरही दिसू लागला आहे. २०१५ नंतर रहाणेची फलंदाजी सरासरी ४० पेक्षाही कमी झाली आहे. मध्यक्रमात सतत फ्लॉप ठरत असल्याने इतर फलंदाजांवर ही दबाव वाढत चालला आहे.
रहाणेला या मालिकेत अनेकदा चांगली सुरुवात मिळाली. परंतु, तो मोठी खेळी करू शकला नाही. दरम्यान, चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात तो एकही धाव न करता माघारी परतला. ख्रिस वोक्सने त्याला पायचीत करत माघारी धाडले. रहाणे बाद झाल्यानंतर, चाहत्यांनी ही सोशल मीडियावर मिम्स शेअर करत संताप व्यक्त केला आहे.(Fans started trolling Ajinkya Rahane after flop show against England in 4th test)
एका युजरने रहाणेला फेअरवेल देत असल्याचा फोटो फोटोशॉप करून शेअर केला आहे. ज्यावर कॅप्शन म्हणून, “आम्ही तुला कधीच विसरणार नाही अजिंक्य रहाणे..जर अजिंक्य रहाणेला पुन्हा एकदा संधी मिळाली तर, हा करूण नायर सारख्या खेळाडूंवर अन्याय असेल.”
तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “कमीतकमी अर्धशतक तरी करायचे होते. खूप निराशाजनक बाब आहे.आता ती वेळ आली आहे की, भारताने ५ व्या क्रमांकावर हनुमा विहारी किंवा मयंक अगरवालला संधी दिली पाहिजे, देवासाठी त्याला सोडून पुढे चला…” तर आणखी एका युजरने अजिंक्य रहाणेला संघाबाहेर करून त्याला फेअरवेल देण्याची मागणी केली आहे.
#ThankYouRahane we won't miss you….if rahane gets backed again, it's unfair and injustice done with Karun Nair imo. pic.twitter.com/fSgQQZasut
— dum biryani (@the_october_kid) September 5, 2021
https://twitter.com/mediaculprit_/status/1434471507116249096
Atleast 50+ was needed from Rahane. Disappointing and probably now India should play Vihari or Mayank at 5 in the 5th Test and move on from Rahane for godsake.
— Vinod (@Kingkohli181892) September 5, 2021
Meanwhile everyone to Rahane #ThankYouRahane pic.twitter.com/NyGbc62JkR
— dum biryani (@the_october_kid) September 5, 2021
Thank you Rahane 🙏🏻
Your tons at Lord’s 2014, MCG in 2014 & 2020 were top class.#ENGvIND #INDvENG pic.twitter.com/c0CxZrm8er
— Harsh🇮🇳 (@TooHarsh_) September 5, 2021
That's my Jinks 😎#AjinkyaRahane #ThankYouRahane#ENGvsIND pic.twitter.com/LAzfFOuKeZ
— Hero Hiralal (@the_herohiralal) September 5, 2021
https://twitter.com/Kl_esque/status/1434486515162234880
#INDvENG
Vihari getting ready to be included in playing XI everytime after Rahane fails 😭 pic.twitter.com/bV6MNJax4W— Khushi🌻 (@damnitkhushi) September 5, 2021
Rahane needs a Break he is tired pic.twitter.com/yrcnWgrleL
— ChaddaParkash 79 (@Chaddaparkash7) September 5, 2021
रहाणे अपयशी ठरला असला तरी ओव्हल कसोटी सामन्यात भारताने दुसऱ्या डावात १४८.२ षटकांत सर्वबाद ४६६ धावा केल्या. त्यामुळे ३६७ धावांची आघाडी घेत इंग्लंडसमोर विजयासाठी ३६८ धावांचे आव्हान ठेवले.
भारताकडून दुसऱ्या डावात रोहित शर्माने १२७ धावांची शतकी खेळी केली. तर, चेतेश्वर पुजारा (६१), शार्दुल ठाकूर (६०) आणि रिषभ पंत (५०) यांनी अर्धशतके केली. तसेच केएल राहुलने ४६ धावांचे आणि विराट कोहलीने ४४ धावांचे योगदान दिले.
इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच ऑली रॉबिन्सन आणि मोईन अलीने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. जेम्स अँडरसन, क्रेग ओव्हरटन आणि जो रुटने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्माचे शतक म्हणजे भारताचा विजय पक्का, ही खास आकडेवारी देते पुरावा
मोठी बातमी! रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी उतरणार नाही, ‘हे’ आहे कारण
स्वत:च्याच विकेटवर वैतागला विराट, आऊट होऊन ड्रेसिंग रुममध्ये परतताच केले असे काही, पाहा व्हिडिओ