ओव्हलच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवशी (४ सप्टेंबर) भारतीय फलंदाजांनी टीचून फलंदाजी केली होती. दरम्यान, विराट कोहली नाबाद परतला होता. तो सामन्याच्या चौथ्या दिवशी मोठी खेळी खेळणार असा अंदाज व्यक्त केला गेला होता. परंतु, तो लवकर माघारी परतला. ज्यानंतर ड्रेसिंग रूममध्येमध्ये जात असताना त्याने प्रचंड संताप व्यक्त केला आहे. ज्याचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या कसोटी सामन्यातील तिसऱ्या चौथ्या चांगल्या लयीत फलंदाजी करताना दिसून येत होता. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली शतकाची प्रतीक्षा अखेर संपणार असे वाटू लागले होते. दरम्यान, १११ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मोईन अलीने त्याला ४४ धावांवर बाद करत माघारी धाडले. मोईन अलीने टाकलेला चेंडू बॅटचा कडा घेत स्लीपमध्ये असलेल्या ओव्हरटनच्या हातात गेला. ओव्हरटनने ही कुठलीही चूक न करता हा झेल टिपला.
विराट कोहली गेल्या काही महिन्यांपासून शतक झळकावण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहे. दरम्यान, सेट होऊन बाद झाल्यानंतर त्याचा संताप अनावर झाला होता. त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये जाताना त्याने हात संतापात ड्रेसिंग रूमच्या दरवाज्याला मारला. (Virat Kohli gets frustrated smashes dressing room door after soft dismissal)
Virat Kohli, come back soon King.#ENGvIND https://t.co/ffgRH64FvH
— Neelabh (@CricNeelabh) September 5, 2021
Another day Another inning without century
Rahane also suffered from bad phase
After struggling on pitch happened bad ????
????Virat kohli caught!!!???????? pic.twitter.com/RKKKIaziZL— ksl (@kslparekh18) September 5, 2021
शतकाची प्रतीक्षा काही संपेना
विराटला या डावातही शतक झळकावण्याची सुवर्णसंधी होती. परंतु, तो पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे. कोहलीला गेल्या ५३ डावात एकही शतक झळकावता आले नाहीये. ही नक्कीच विराट कोहलीसाठी चिंता वाढवणारी बाब असेल. विराटने शेवटचे शतक बांगलादेश संघाविरुद्ध २०१९ मध्ये झळकावले होते. तसेच त्याने १ जानेवारी २०२० पासून २६.८० च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
टोकियो पॅरालिम्पिकची सांगता! भारताने १९ पदकांसह रचला इतिहास, पदकतालिकेत देशाला मिळाला ‘हा’ क्रमांक
शिक्षकदिन! आजपर्यंत टीम इंडियाला लाभलेले गुरु, ज्यांनी घडवला इतिहास
ऑस्ट्रेलियाचे घातक गोलंदाज शॉन टेट भारताच्या ‘या’ रणजी संघाला देणार प्रशिक्षण