पुणे। फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत साखळी फेरीत डेक्कन चार्जर्स, एफसी मेटालिका, मॉँट व्हर्ट प्रीस्टाईन या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात एफसी मेटालिका संघाने डेक्कन आरएफ संघाचा 22-16 असा पराभव करून दुसरा विजय मिळवला. एफसी मेटालिका संघाकडून अभय सोनटक्के, शौनक कासट, सिद्धेश परळकर, अमित नूलकर, सुमित सातोस्कर, लक्ष्मण विडेकर यांनी अफलातून कामगिरी बजावली. दुसऱ्या सामन्यात मुकुंद जोशी, नितीन जोशी, अमोद वाकलकर, अजित सैल, ऋषिकेश पाटस्कर, आशिष पुंगलिया, चिराग शहा यांच्या विजयी खेळीच्या जोरावर डेक्कन चार्जर्स संघाने ओडीएमटी 2 संघाचा 24-06 असा पराभव केला. अन्य लढतीत मॉँट व्हर्ट प्रीस्टाईन संघाने टेनिस द मिनाज संघाचा 23-11 असा पराभव केला.
साखळी फेरी:
एफसी मेटालिका वि.वि.डेक्कन आरएफ 22-16(100 अधिक गट: अभय सोनटक्के/शौनक कासट वि.वि.धनंजय सावंत/आशिष धोंगडे 6-4; 90 अधिक गट: सिद्धेश परळकर/अमित नूलकर वि.वि.श्रीनिवास रामदुर्ग/संदीप माहेश्वरी 6-2; खुला गट: सुमित सातोस्कर/लक्ष्मण विडेकर वि.वि.राहुल मंत्री/समीर सावळा 6-4; खुला गट: नकुल फिरोदिया/शौनक कासट पराभूत वि.आशिष धोंगडे/अमलेश आठवले 4-6;
डेक्कन चार्जर्स वि.वि.ओडीएमटी 2 24-06(100 अधिक गट: मुकुंद जोशी/नितीन जोशी वि.वि.जे. श्रीधर/कार्तिक श्रीधर 6-0; 90 अधिक गट: अमोद वाकलकर/अजित सैल वि.वि.पंकज खरे/शैलजा कुमार 6-1; खुला गट: मुकुंद जोशी/ऋषिकेश पाटस्कर वि.वि.राहुल पाटील/अमित बागडे 6-0; खुला गट: आशिष पुंगलिया/चिराग शहा वि.वि.डीके दर्शन/अजिंक्य गुजराती 6-0);
मॉँट व्हर्ट प्रीस्टाईन वि.वि.टेनिस द मिनाज 23-11(100 अधिक गट: गिरीश कुकरेजा/सुधाकर आर पराभूत वि.राजीव पागे/कल्पक पत्की 5-6(7-3); 90 अधिक गट: मनिष टिपनीस/सचिन माधव वि.वि.शैलेश लिमये/अजिंक्य मुठे 6-1; खुला गट: सतीश ओरसे/सोमनाथ पवार वि.वि.अभिजीत शहा/निलेश कुंटे 6-0; खुला गट: गिरीश कुकरेजा/जॉर्ज वरघसे वि.वि.रोहन जमेनीस/कल्पक पत्की 6-4)
महत्त्वाच्या बातम्या –
चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत टायगर्स, लायन्स, एफसी जीएनआर संघांची आगेकूच
चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन चार्जर्स, टायगर्स, एफसी मेटालिका संघांचे विजय
चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धा: दुहेरीत रोहन बोपन्ना व रामकुमार रामनाथन जोडीला विजेतेपद