फिफा विश्वचषकाच्या गट फेरीचा गुरवार, २८ जूनला समारोप झाला. आता साऱ्या फुटबॉल प्रेमींच्या नजरा बाद फेरीकडे लागल्या आहेत.
गतविजेत्या जर्मनीचे आव्हान गट फेरीत संपल्याने यावेळी फिफा विश्वचषकाला नवा विजेता मिळणार आहे.
शनिवार, ३० जूनपासून फिफा विश्वचषक २०१८ च्या बाद फेरीला अर्जेंटीना वि.फ्रान्स सामन्याने सुरवात होत आहे.
असे असतील बाद फेरीतील सामने
१) अर्जेंटीना वि.फ्रान्स, २) पोर्तूगाल वि.उरुग्वे, ३) ब्राझील वि.मेक्सिको,
४) बेल्जिअम वि.जपान, ५) स्पेन वि.रशिया, ६) क्रोएशिया वि.डेनमार्क
७) स्वीडन वि.स्विझर्लंड, ८) इंग्लंड वि. कोलंबिया
बाद फेरीत प्रत्येक गटातील दोन अव्वल संघांनी प्रवेश केला आहे. यामध्ये आता स्पर्धेत पुढे जाण्यासाठी हे अव्वल संघ एकमेकांशी दोन हात करतील.
स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी बाद फेरीतील संघ उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपदाच्या दृष्टीने स्पर्धेत पुढे वाटचाल करतील.
महत्त्वाच्या बातम्या-
–फिफा विश्वचषक: गट फेरीतील दुसऱ्या स्थानाचा इंग्लंडला होणार मोठा लाभ
–रोनाल्डोच्या पोर्तुगालचं पुढच्या सामन्यात पराभूत होण्याच लाॅजिक रेस ३ पेक्षाही वाईट