मंगळवारी (26 मार्च) सीएसकेसाठी ऋतुराज गायकवाड आणि रचिन रविंद्र यांनी धमाकेदार सुरुवात केली. दोघांच्या वादळी खेळीमुळे सीएसकेला गुजरात टायटन्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 206 धावांपर्यंत मजल मारता आली. एमएस धोनी याच्या सीएसकेने या धावा 6 विकेट्सच्या नुकसानावर केल्या आणि गुजरात टायटन्सला विजयासाठी 207 धावांचे लक्ष्य मिळाले.
कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि रचिन रविंद्र (Rachin Ravindra) यांनी डावाची सुरुवात करताना प्रत्येकी 46-46 धावांची खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर आलेला अजिंक्य रहाणे 12 धावा करून बाद झाला. पण त्यानंतर चौथ्या क्रमांकावर खेळताना शिवम दुबे याने 51 धावांची सर्वोत्तम खेळी केली. डॅरिल मिचेल 24* धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. तर समीर रिझवी याने 6 चेंडूत 14 धावांची खेळी. अष्टपैलू रविंद्र जडेजा याने 3 चेंडूत 7 धावा करून विकेट गमावली.
राशिद खान याने 4 षटकात 49 धावा केल्या 2 विकेट्स घेतल्या. साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन आणि मोहीत चौहान यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
चेन्नई सुपर किंग्ज : रुतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे , मुस्तफिजुर रहमान.
गुजरात टायटन्स : रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, आर साई किशोर, उमेश यादव, मोहित शर्मा, स्पेन्सर जॉन्सन.
महत्वाच्या बातम्या –
बॅटिंग घेऊ की बॉलिंग? नाणेफेक जिंकल्यानंतर शुबमन गिल कंफ्यूज, व्हिडिओ व्हायरल
मोठी बातमी! महिला आशिया चषकाच्या तारखा जाहीर! पाहा संपूर्ण वेळापत्रक