वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा गुरुवारी (5 ऑक्टोबर) सुरुवात झाली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मागील विश्वचषकाचा विजेता इंग्लंड व उपविजेता न्यूझीलंड यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या सर्व फलंदाजांनी थोडे थोडे योगदान देत संघाला 9 बाद 282 अशी चांगली मजल मारून दिली. यासोबतच इंग्लंडने विश्वचषक इतिहासातील एक नवा विक्रम प्रस्थापित केला.
प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर इंग्लंडला जॉनी बेअरस्टो व डेव्हिड मलान यांनी चांगली सुरुवात दिली. त्यानंतर हॅरी ब्रुक व मोईन अली हे देखील दुहेरी धावसंख्या गाठण्यात यशस्वी ठरले. रूटने 77 तर बटलरने 43 धावांचे योगदान दिले. या व्यतिरिक्त लियाम लिव्हिंगस्टोनने 20, सॅम करनने 14 व ख्रिस वोक्सने 11धावा केल्या. इंग्लंड 260 पर्यंत मजल मारेल असे वाटत असताना आदिल रशिद व मार्क वूड यांनी 30 धावांची भागीदारी करत इंग्लंडला 282 पर्यंत मजल मारून दिली.
वनडे विश्वचषक क्रिकेटच्या इतिहासात ही पहिलीच वेळ होती जेव्हा सर्व 11 खेळाडूंनी दुहेरी धावसंख्या गाठली. आतापर्यंत वनडे विश्वचषकाचे 12 हंगाम खेळले गेले आहेत. यामध्ये अशी कामगिरी इतर कोणताही संघ करू शकला नव्हता. मात्र, तेराव्या विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडने हा विश्वविक्रम करून दाखवला.
(First time in World Cup history All the 11 players scored runs in double digits , England Cricket History)
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकपचं पहिलं अर्धशतक रुटच्या नावावर, एकट्याने फोडून काढली न्यूझीलंडची गोलंदाजी
‘काय राव हे…?’, पत्रकाराच्या प्रश्नावर रोहितने दिली ‘अशी’ रिऍक्शन, पाकिस्तानी कर्णधार बाबरही झाला लोटपोट