जगभरात सर्वाधिक चाहते कोणत्या टी२० लीगचे असतील, तर कदाचित सर्वप्रथम यादीत भारतातील इंडियन प्रीमिअर लीग हेच नाव येईल. या लीगमध्ये जगभरातील क्रिकेटपटू आपला दम दाखवत असतात. या खेळाडूंना पाहण्यासाठी चाहत्यांसोबतच मोठ-मोठे कलाकारही आवर्जुन हजेरी लावतात. अशात चाहतेही आपल्या आवडत्या कलाकाराच्या शेजारी बसून सामना पाहण्याचा आनंद लुटतात. असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा बॉलिवूड अभिनेत्री आहे, त्यामुळे ती मैदानात आपल्या पतीला आणि संघाला प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित असतेच. यावेळी एका चाहतीने पहिल्यांदाच मैदानात सामना पाहण्यासाठी गेली आणि तिला अनुष्कासोबत सामना पाहण्याची संधी मिळाली.
या महिला चाहतीने आपला हा अनुभव एका व्हिडिओद्वारे शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर वेगाने पसरला आहे. या चाहतीचे नाव रवीना आहुजा आहे. रवीनाला (Raveena Ahuja) अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि तिच्या कुटुंबाजवळ बसून सामन्याचा आनंद लुटण्याची संधी मिळाली. ती मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये कार्पोरेट बॉक्समध्ये आयपीएल सामना पाहत होती. रवीनाने इंस्टाग्राम रील्सवर मागील आठवड्यात शनिवारी (१६ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामन्याचा छोटा व्हिडिओ शेअर केला.
https://www.instagram.com/reel/Ccch9AzAIUE/?utm_source=ig_web_copy_link
व्हिडिओच्या सुरुवातीला रवीना आपल्या कारमध्ये पोझ देताना दिसली. तिने व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले की, “अनुष्का शर्मासोबत संपूर्ण आयपीएल सामने पाहत आहे.” यानंतर तिला स्टँडमध्ये हसताना आणि सामना पाहतेवेळी नाश्ता करताना दिसली. सोबतच क्लिपमध्येही लिहिले की, “वानखेडे स्टेडियममध्ये कार्पोरेट बॉक्स.” क्लिपमध्ये पुढच्या भागात अनुष्काला रवीनापासून काही अंतरावर हसताना आणि सामना पाहताना पाहू शकता. यावर लिहिले होते की, “इथे आहे तिची झलक… आणखी पाहण्यासाठी शेवटपर्यंत वाट पाहा.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या क्लिपमध्ये अनुष्काही टाळ्या वाजवताना दिसतेय. पुढील व्हिडिओत रवीना अनुष्काच्या कुटुंबासमोर बसून जेवण करताना दिसते. तिने लिहिले की, “अनुष्का शर्माचे कुटुंब एकदम आमच्या समोर.” या व्हिडिओच्या शेवटी रवीना आपल्या मित्रमंडळींसोबत अनुष्कासोबत कॅमेऱ्यासाठी पोझ देताना दिसतेय. यादरम्यान अनुष्का काही म्हणताना दिसतेय आणि हसू लागते. हे पाहून प्रत्येकजण पोट धरू हसू लागतात. रवीना यावर लिहिते की, “शेवटी तिच्यासोबत एक व्हिडिओ क्लिप करण्यात यशस्वी झाले. तिला हसताना पाहिले.”
हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी थेट सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गेले होते आणि हा आतापर्यंतचा सर्वोत्तम अनुभव होता. @kireetrijhwani खूप खूप धन्यवाद.” हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने दिल्ली संघाला १६ धावांनी पराभूत केले होते. या सामन्यात नाबाद ६६ धावांची खेळी केल्यामुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सचिनला लाडक्या लेकाकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; म्हणाला, ‘माझ्यासाठी जे काही केले आहे…’
टी२० विश्वचषकात मॅथ्यू वेडचा कॅच सोडल्यानंतर मला कित्येक रात्र वाईट स्वप्न पडत होती- हसन अली
‘आम्ही मोठी धावसंख्या उभारू शकलो असतो, पण…’, आरसीबीच्या कर्णधाराने सांगितली कुठे झाली चूक