---Advertisement---

इंग्लंड दौरा नडला; ५ भारतीय क्रिकेटपटू, जे इंग्लंडच्या भूमीत ठरले फ्लॉप अन् कसोटी संघातून मिळाला डच्चू

On: शुक्रवार, मे 21, 2021 12:16 PM
---Advertisement---

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळात कधी काय होईल सांगता येत नाही. अनेक क्रिकेटपटू आयपीएल स्पर्धेत आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून राष्ट्रीय संघात स्थान मिळवत असतात. काही खेळाडू चमकतात तर काही खेळाडूंना साजेशी कामगिरी करण्यात अपयश येते, ज्यामुळे त्यांच्या कारकिर्दीवर अनपेक्षित ब्रेक लागतो. भारतीय कसोटी संघात असे काही क्रिकेटपटू होऊन गेले आहेत, ज्यांना इंग्लंड दौऱ्यावर केलेल्या खराब कामगिरीमुळे संघातील स्थान गमवावे लागले आहे. त्याच काही क्रिकेटपटूंचा येथे आढावा घेण्यात आला आहे.

इंग्लंडच्या भूमीत शेवटचा कसोटी सामने खेळलेले भारतीय क्रिकेटपटू-

१) शिखर धवन : भारतीय संघाचा डाव्या हाताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याने २०१३ मध्ये भारतीय कसोटी संघात प्रवेश केला होता. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळलेल्या पदार्पणाच्या सामन्यात शिखर धवनने १८७ धावांची खेळी केली होती. आतापर्यंत त्याने ३४ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ४०.६१ च्या सरासरीने २३१५ धावा केल्या आहेत. यात त्याने ७ शतक आणि ५ अर्धशतक लगावले आहे.

परंतु २०१८ मध्ये झालेला इंग्लंड दौरा त्याचा शेवटचा कसोटी दौरा ठरला. लंडन कसोटी सामन्यात त्याला दोन्ही डावात ३ आणि १ धाव करता आली होती. त्यानंतर त्याला एकही कसोटी सामना खेळता आला नाहीये.

२) दिनेश कार्तिक : भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात २००४ मध्ये केली होती. आतापर्यंत त्याने २६ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला २५.०० च्या सरासरीने १०२५ धावा करण्यात यश आले आहे. त्याला १ शतक आणि ७ अर्धशतक झळकावण्यात यश आले आहे. भारतीय संघात एमएस धोनी असल्यामुळे त्याला जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. परंतु जेव्हा त्याला कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली तेव्हा तो आपली छाप सोडू शकला नाही. कर्तिकने देखील लंडनच्या मैदानावर २०१८ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्या सामन्यात त्याला १ आणि ० धावा करण्यात यश आले होते.

३) पंकज सिंग : उत्तरप्रदेशमधील सुलतानपूरचा रहिवाशी ३६ वर्षीय गोलंदाज पंकज सिंग याने २०१४ मध्ये आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती. परंतु हाच दौरा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा दौरा ठरला. त्याला २ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली होती. ज्यामध्ये त्याला अवघे २ गडी बाद करण्यात यश आले होते. मँचेस्टर कसोटी सामन्यानंतर त्याला एकही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

४) एस श्रीसंत : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज, एस श्रीसंत हा क्रिकेट कारकिर्दीत आपल्या कामगिरीमुळे कमी आणि वाद विवादमुळे जास्त चर्चेत राहिला आहे. २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकल्यानंतर त्याला काही वर्ष क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात २००६ मध्ये इंग्लंड मध्ये केली होती. ५ वर्षानंतर २०११ मध्येच त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना इंग्लंड मध्ये खेळला होता. त्याने शेवटच्या कसोटी सामन्यात ३ गडी बाद केले होते.

५) आर पी सिंग : भारतीय संघातील डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज आर पी सिंग याने २००६ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात २००६ मध्ये पाकिस्तान संघाविरुद्ध केली होती. त्याला कसोटी क्रिकेटमध्ये साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. त्याला अवघे १४ सामने खेळण्याची संधी मिळाली.

आरपी सिंगने देखील २०११ इंग्लंड दौऱ्यानंतर एकही कसोटी सामना खेळला नाही. ओव्हल कसोटी सामन्यात आरपी सिंगने ३४ षटक गोलंदाजी केली होती. यात त्याला एकही गडी बाद करण्यात यश आले नव्हते. त्यानंतर त्याला भारतीय कसोटी संघात खेळण्याची संधी मिळाली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

‘सतत अदलाबदली केली, नाहीतर मी आज ४९ नव्हे २४९ सामने खेळलो असतो,’ भारतीय फलंदाजाने मांडली व्यथा

तीन वर्षांपुर्वीच द्रविडला मिळाली होती टीम इंडियाचा महागुरु बनण्याची ऑफर, ‘या’ कारणामुळे दिला होता नकार

“तो रिषभ पंतच आहे, ज्याने भारतीय संघाला कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात पोहोवलंय”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---