---Advertisement---

श्रेयस अय्यर आधी कसोटी पदार्पण केलेेले ५ खेळाडू सध्या करतायेत तरी काय?

On: गुरूवार, नोव्हेंबर 25, 2021 12:20 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत या सामन्याचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेच्या हाती देण्यात आले आहे, तर याच सामन्यात श्रेयस अय्यर याचे कसोटी पदार्पण देखील झाले आहे. तो कसोटी कॅप मिळवणारा ३०३ वा खेळाडू ठरला आहे. त्याला सुनील गावसकर यांच्या हस्ते ही कॅप देण्यात आली आहे.

परंतु, तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडत असेल की, श्रेयस अय्यर पूर्वी पदार्पण केलेले खेळाडू सध्या काय करत असतील? त्याच ५ खेळाडूंबद्दल अधिक माहिती या लेखात जाणून घेणार आहोत.

१) शूबमन गिल – भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शूबमन गिल याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर डावाची सुरुवात करण्याची संधी देण्यात आली होती. तो कसोटी कॅप मिळवणारा २९८ वा खेळाडू ठरला होता. या दौऱ्यावर पृथ्वी शॉ फ्लॉप ठरल्यानंतर त्याच्या ऐवजी शूबमन गिलला स्थान देण्यात आले होते. या संधीचा लाभ घेत त्याने अप्रतिम कामगिरी केली होती. सध्या तो न्यूझीलंड संघाविरुद्ध सुरू असलेली कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे.

२) नवदीप सैनी – भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी याने याच वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. तो कसोटी कॅप मिळवणारा २९९ वा खेळाडू ठरला होता. तर भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याला पदार्पणाची कॅप दिली होती. त्याला न्यूझीलंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत संधी देण्यात आली नाहिये. तो सध्या भारतीय अ संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला आहे.

३) टी नटराजन – भारतीय संघातील डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज टी नटराजनला यावर्षी झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. याच दौऱ्यावर त्याने वनडे, टी२० आणि कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचा विक्रम केला होता. तसेच तो कसोटी क्रिकेटमध्ये कॅप मिळवणारा ३०० वा खेळाडू ठरला होता. नुकताच संपन्न झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ स्पर्धेत टी नटराजनने तामिळनाडू संघाचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु, आता विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा तोंडावर असताना टी नटराजनला दुखापतीमुळे एनसीएमध्ये जावे लागणार आहे.

४) वॉशिंग्टन सुदंर – भारतीय संघाचा युवा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुदंर याने देखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. तो कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा ३०१ क्रमांकाचा खेळाडू ठरला होता. तो सध्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेची तयारी करण्यात व्यस्त आहे.

५) अक्षर पटेल – भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याला यावर्षी इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. इंग्लंड संघ जेव्हा भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी अक्षर पटेलने अप्रतिम गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांचा घाम काढला होता.तो भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा ३०२ क्रमांकाचा खेळाडू ठरला होता. सध्या तो न्यूझीलंड संघाविरुद्ध सुरू असलेली २ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Video: गावसकरांच्या हस्ते पदार्पणाची कॅप मिळताच अय्यर भावूक, अशी राहिलीये मुंबईकर फलंदाजाची प्रथम श्रेणी कामगिरी

“भारतीय संघाला मायदेशात न्यूझीलंडचा एकच फलंदाज अडचणीत टाकू शकतो”

दर्जेदार! भारतात खेळताना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी केलेली सर्वोत्तम ५ खेळी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---