ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव 132 धावांनी विजय मिळवला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघ स्वस्तात बाद झाल्यानंतर भारताने मात्र मोठी धावसंख्या उभी केली. पहिल्या डावात भारताने घेतलेली आघाडीची बरोबरी ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या डावात देखील करू शकला नाही. भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली पहिल्या डावात चुकीचा शॉट खेळण्याच्या नादात बाज झाला. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयन चॅपल यांनी विराटवर जहरी टीका केली.
नागपूर कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजीला आल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) मोठी खेळी करेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र, विराटने अवघ्या 12 धावा करून विकेट गमावली. सामन्याच्या दुसऱ्या दिवसी दुपारच्या जेवणानंतर दोन्ही संघ मैदानात खेळण्यासाठी पुन्हा आले. यावेळी विराट कोहली स्ट्राईकवर होता आणि नवख्या टॉड मर्फी (Todd Murphy) याने पहिल्याच चेंडूवर त्याला स्लिप्समध्ये झेलबाद केले. मर्फीच्या संपूर्ण स्पेलमधील सर्वात खराब चेंडूवर विराटने विकेट गमावली. चेंडू शॉर्ट होता आणि लेग स्टंपच्या बाहेर चालला होता. मात्र खेळपट्टीवर चेंडूला बाउंस न मिळाल्यामुळे विराटकडून ही चूक झाली. चेंडूला बाउंस मिळाल्यानंतर विराट लेग साईडला शॉट खेळून काही धावा मिळवू शकत होता. मात्र चेंडू खाली राहिल्याने त्याला विकेट गमवावी लागली.
चेंडू अशा प्रकारे चुकीचा शॉट खेलून बाद झाल्यानंतर त्याच्यावर टीका होत आहे. पण माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज इयान चॅफल (Ian Chappell) यांना विराटवर जहरी टीका केल्याने वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. विराट चुकीचा शॉट खेळून झेलबाद झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना एक असे वक्तव्य केले, जे विराटच्या चाहत्यांच्या मनाला चांगले लागले आहे. चॅपल म्हणाले की, “विराट कोहली तो शॉट खेळतच कशासाठी होता? मी जर फाइन-लेगवर अशा पद्धतीने स्लिप्समध्ये बाद झालो असतो, तर स्वतःला फाशी लावून घेतली असती.”
Virat Kohli's poor form continues in Test cricket !! #INDvAUS #viratkholiOUT pic.twitter.com/we2RaCRYMJ
— Bii2 🇮🇳 (@realbii2) February 10, 2023
दरम्यान, उभय संघांतील या कसोटी सामन्याचा एकंदरीच विचार केला, तर भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजीला आलेला ऑस्ट्रेलियन संघ रविंद्र जडेजाच्या फिरकीच्या जाळ्यात (5 विकेट्स) अडकला. प्रत्युत्तरात कर्णधार रोहित शर्मा (120 धावा) याच्या शतकीय खेळीच्या जोरावर भारत 400 धावा करू शकला. 223 धावांनी मागे पडलेला ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या डावात अधिकच अडचणी असल्याचे पाहायला मिळाले. रविचंद्रन अश्विनने सुरुवातीच्या विकेट्स घेतल्यानंतर (पहिल्या सहा विकेट्सपैकी पाच विकेट्स) ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या डावात अवघ्या 91 धावा करून सर्वबाद झाला. या विजयानंतर भारत यावर्षीच्या बॉर्डर गावसकर मालिकेत 1-0 अशा आघाडीवर आहे. (Former Australian captain Ian Chaffle criticized Virat Kohli)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्वत:च्या फायद्यासाठी जडेजा-अश्विन अन् अक्षरने रोहितवर टाकलेला दबाव; कर्णधाराचा मोठा खुलासा
“ते विमानात बसले तेव्हाच घाबरले”, दणदणीत विजयानंतर जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियन संघाची खिल्ली