पाकिस्तान संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपला तिसरा सामना भारताविरुद्ध खेळला. या सामन्यात पाकिस्तानला 7 विकेट्सने पराभवाचा धक्का बसला. या पराभवानंतर पाकिस्तानवर चोहोबाजूंनी टीकास्त्र डागले जात आहे. त्यांच्याच देशाच्या अनेक माजी खेळाडूंनी संघाच्या दृष्टिकोन आणि बाबर आझम याच्या नेतृत्वाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अशातच आता भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानेही पाकिस्तानविषयी मोठे विधान केले आहे.
काय म्हणाला गांगुली?
भारतीय संघाचा दिग्गज माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) म्हणाला की, “आमच्यावेळी पाकिस्तान संघ खूपच वेगळा होता. हा त्याप्रकारचा संघ नाहीये, ज्यांच्याशी आम्ही खेळायचो. फलंदाजीदरम्यान हा संघ दबावाचा सामना करू शकत नाही. या फलंदाजी फळीसोबत पाकिस्तान संघाचे 2023 विश्वचषकात पुनरागमन करणे खूपच कठीण आहे.”
शोएब मलिकनेही उपस्थित केले प्रश्न
पाकिस्तानच्या नेतृत्वाविषयी शोएब मलिक यानेही प्रश्न उपस्थित केले. तो म्हणाला की, “जर बाबर आझम याने राजीनामा दिला, तर शाहीन आफ्रिदी मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा कर्णधार बनला पाहिजे. त्याने दाखवले आहे की, तो लाहोर कलंदर्ससाठी आक्रमक कर्णधार आहे.”
भारताविरुद्ध पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव
विश्वचषकात 14 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सामना खेळला गेला होता. या सामन्यात पाकिस्तान संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. पाकिस्तान संघाने भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 42.5 षटकात 191 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करत 117 चेंडू शिल्लक ठेवत हे आव्हान पार केले होते. तसेच, सामना 7 विकेट्सने जिंकला होता.
पाकिस्तानने भारताविरुद्ध गमावला विश्वचषकातील 8वा सामना
पाकिस्तान संघाने वनडे विश्वचषकाच्या इतिहासात 1992 ते 2023दरम्यान भारताविरुद्ध सलग 8 सामने गमावले आहेत. मात्र, यावेळी बाबर आझमच्या नेतृत्वातील संघाकडून अपेक्षा केली जात होती की, त्याचा संघ विश्वचषकात भारताविरुद्ध विजय मिळवेल. मात्र, असे होऊ शकले नाही. (former captain sourav ganguly on pakistan team in world cup 2023 know here)
हेही वाचा-
IND vs BAN: बांगलादेशने जिंकला टॉस, टीम इंडिया विजयी ‘चौकार’ मारण्यासाठी सज्ज; पाहा Playing XI
पंड्याकडून भारताच्या 2023 विश्वचषकातील यशाचा खुलासा; म्हणाला, ‘आम्ही ड्रेसिंग रूममध्ये सर्वांचे…’