---Advertisement---

समालोचन करताना पुन्हा घसरली गावसकरांची जीभ; प्रसिद्ध खेळाडूच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह विधान

Sunil-Gavaskar
---Advertisement---

क्रिकेटविश्वात खेळाडू, त्यांची कामगिरी आणि त्यांच्या वक्तव्याला खूप महत्त्व असते. एखाद्या खेळाडूने दुसऱ्या खेळाडूची प्रशंसा केली, तर त्याची चर्चा जागतिक क्रिकेटमध्ये होते. मात्र, जर दिग्गज खेळाडूच्या तोंडून एखाद्या खेळाडूविषयी वादग्रस्त वक्तव्य निघालं, तर त्याची चर्चा कित्येक दिवस सुरूच असते. त्यामुळे त्या-त्या खेळाडूंना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. असेच काहीसे भारतीय संघाचे माजी दिग्गज कर्णधार सुनील गावसकर यांच्यासोबत घडले होते. गावसकरांच्या नावावर अनेक शानदार विक्रम आहे. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी शानदार प्रदर्शन केले आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ते समालोचनाकडे वळले. त्यांनी अनेक सामन्यात समालोचन केले आहे. मात्र, समालोचनादरम्यानच त्यांच्याकडून मोठी चूक झाली होती.

सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) याच्या पत्नीविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांना समालोचन पॅनेलमधून काढून टाकण्याच्या मागणीने चांगलाच जोर धरला होता.

खरं तर, सन 2022च्या आयपीएलमध्ये 20 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Rajasthan Royal vs Chennai Super Kings) संघात सामना खेळला जात होता. यादरम्यान गावसकर इंग्रजी समालोचन पॅनेलचा भाग होते. चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करताना 150 धावा चोपल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला राजस्थान संघ संघर्ष करत होता. तसेच, जबाबदारी हेटमायरच्या खांद्यावर आली होती. ज्यावेळी हेटमायर फलंदाजीसाठी आला, तेव्हा गावसकर म्हणाले होते की, “शिमरॉन हेटमायरच्या पत्नीने डिलीव्हर केले आहे, आता हेटमायर राजस्थानसाठी डिलीव्हर करू शकेल का?”

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1527699647350706177

भडकलेले चाहते
खरं तर, या सामन्याच्या 3-4 दिवसांपूर्वीच हेटमायरच्या पत्नीने बाळाला जन्म दिला होता. त्यामुळे गावसकरांनी समालोचन करताना डिलीव्हर शब्दाचा वापर केला होता. या वैयक्तिक भाष्यानंतर गावसकरांना समालोचन पॅनेलमधून हटवण्याची मागणी करण्यात आली होती. चाहते त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे खूपच निराश होते. सोशल मीडियावर अनेक जण त्यांच्या हाकालपट्टीची मागणीही करत होते.

अनुष्का शर्माबद्दलही केलेलं वक्तव्य
त्यापूर्वी विराट कोहली खराब फॉर्मशी झगडत असताना गावसकरांनी त्याच्या पत्नीचं म्हणजेच अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिचं नाव घेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, “जेव्हा लॉकडाऊन होते, तेव्हा त्याने फक्त अनुष्काच्या गोलंदाजीचा सराव केला होता. ते व्हिडिओमध्ये दिसले होते.” या भाष्यावर अनुष्कानेही सडेतोड प्रत्युत्तर दिले होते.

आयपीएल 2023 स्पर्धेला 31 मार्चपासून सुरुवात
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेला पुढील महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Gujarat Titans vs Chennai Super Kings) संघात खेळला जाणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 28 मे रोजी होणार आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेचा पहिला आणि अंतिम सामना हा नरेंद्र मोदी स्टेडिअम, अहमदाबाद येथे होणार आहे. (former cricketer sunil gavaskar comment on shimron hetmyer wife deliver remark in ipl 2022 in csk vs rr)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिनेश कार्तिकने झुंजार खेळी करूनही संघाच्या पदरी अपयश; फायनलमध्ये रिलायन्सचा शानदार विजय
मुलींना पाहताच धूम ठोकणारा भारतीय खेळाडू कोण? सर्वात आळशी क्रिकेटरचे नाव ऐकून तुम्हालाही बसेल झटका

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---