इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेनंतर आशियातील प्रसिद्ध टी20 लीगमध्ये लंका प्रीमिअर लीग स्पर्धेचाही समावेश होतो. या लीगमध्ये एकापेक्षा एक स्टार खेळाडू सहभागी होत असतात. लंका प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला 31 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंची यादीही जाहीर झाली आहे. मात्र, यादरम्यान श्रीलंका क्रिकेटकडून एक मोठी चूकही झाली आहे. त्यांनी सुरेश रैना याचे नाव लिलावाच्या यादीत टाकले आहे.
अलीकडेच असे वृत्त आले होते की, सुरेश रैना (Suresh Raina) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार आहे. तो लंका प्रीमिअर लीग (Lanka Premier League) स्पर्धेत खेळताना दिसेल. अनेकांना ही बातमी खरीच आहे असे वाटले होते. मात्र, ही खोटी बातमी ठरली. रैनाने अद्याप स्वत: या स्पर्धेसाठी नाव दिले नाहीये.
या लीगमध्ये लिलावादरम्यान रैनाचे नाव यादीत होते. मात्र, त्याचे नाव एकदाही पुकारले गेले नव्हते. त्याची मूळ किंमत 50000 डॉलर ठेवण्यात आली. खरं तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर रैना रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज, अबू धाबी टी10 लीग आणि लीजेंड लीग क्रिकेटमध्ये खेळताना दिसतो.
रैना टी20 सामन्यांमध्ये सर्वोत्तम करण्यासाठी ओळखला जातो. त्याने अबू धाबी टी10 लीगमध्ये डेक्कन ग्लेडिएटर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यादरम्यान तो फक्त 3 सामने खेळू शकला होता. त्याने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करत अनेक किताब जिंकण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. रैनाने त्याच्या आयपीएल कारकीर्दीत 205 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 32.52च्या सरासरीने 5528 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 39 अर्धशतकांचा समावेश होता.
रैनाला पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर खेळताना पाहायचे असेल, तर तुम्हाला लीजेंड लीग क्रिकेट किंवा अबू धाबी टी10 लीगची वाट पाहावी लागू शकते. (former cricketer suresh raina did not register himself in lanka premier league 2023 yet his name comes on auction pool)
महत्वाच्या बातम्या-
‘वनडे विश्वचषकात टॉप-4मध्ये पोहोचणार पाकिस्तान’, दिग्गजाचा मोठा दावा
केकेआरचे स्टार खेळाडू गाजवणार अमेरिकेची टी20 लीग; यादीत रसेल ते रॉय, ‘या’ खेळाडूंचा समावेश