---Advertisement---

“हार्दिक पांड्याला कर्णधार न करण्याचा निर्णय योग्य” माजी क्रिकेटपटूचं खळबळजनक वक्तव्य

On: रविवार, जुलै 28, 2024 2:45 PM
---Advertisement---

भारताच्या श्रीलंका दौऱ्याला (India Tour of Sri Lanka) शनिवारी (27 जुलै) सुरुवात झाली. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला टी20 सामना खेळला गेला. या सामन्यात भारतानं सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली 43 धावांनी शानदार विजय मिळवला आणि टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. तत्पूर्वी माजी भारतीय प्रशिक्षक लालचंद राजपूत (Lalchand Rajput) म्हणाले की, हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) भारतीय संघाचा कर्णधार केलं नाही हे ठिक आहे. कारण तो आता मुक्त होऊन खेळेल.

‘हिंदुस्तान टाईम्स’शी बोलताना लालचंद राजपूत (Lalchand Rajput) म्हणाले, “मला वाटते की निवडकर्त्यांनीही प्रशिक्षकाप्रमाणेच विचार केला असावा. हार्दिकने चांगली कामगिरी करावी अशी व्यवस्थापनाची इच्छा आहे. जर त्यांनी त्याला कर्णधारपदावरुन मुक्त केले तर तो मोकळा होऊन खेळू शकेल. पांड्या आता फलंदाजी आणि गोलंदाजीसह सर्वोत्कृष्ट कामगिरी करु शकेल.” सूर्यकुमार यादवबद्दल (Suryakumar yadav) बोलताना राजपूत म्हणाले, “सूर्या मुंबईच्या रणजी संघाचा कर्णधारही राहिला आहे आणि त्याने टी20 फॉरमॅटमध्ये लवकर सुरुवात केली. तो भारतीय संघाचे उत्तम प्रकारे नेतृत्व करेल.”

लालचंद राजपूत (Lalchand Rajput) हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) कसोटी खेळण्यावर म्हणाले, “मला त्याला लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला आवडेल. तो असा खेळाडू आहे जो तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळाची दिशा बदलू शकतो. जर त्याने लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली, तर तो संघात स्वत:चे महत्त्व सिद्ध करु शकतो.”

हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) वय सध्या 30 वर्ष आहे. तो 2024च्या झालेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघाचा उपकर्णधार होता. त्यानं टी20 विश्वचषकात भारतासाठी चमकदार कामगिरी केली. फलंदाजी आणि गोलंदाजीनं त्यानं सर्वांना प्रभावित करुन टाकलं होतं. परंतू टी20 विश्वचषक झाल्यानंतर त्याला श्रीलंका दौऱ्यावर एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार, उपकर्णधार देखील बनवण्यात आलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

विश्वविजेत्या संघातील खेळाडूला हेड कोच गंभीरनं डावललं? पहिल्या सामन्यातच बसावं लागलं बाहेर
अवघ्या 29 मिनिटांत काम तमाम! पीव्ही सिंधूच्या ऑलिम्पिक मोहिमेला धडाक्यात सुरुवात
अफगाणिस्तान भारतात खेळणार कसोटी सामना, तारीख आणि मैदान ठरलं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---