भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चौथ्या कसोटीसाठी सज्ज झाला आहे. (26 डिसेंबर) रोजी दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. मेलबर्नमध्ये सुरू होणाऱ्या या सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान आता माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी मालिकेत बरोबरी साधण्यासाठी बुमराहला ‘वन मॅन आर्मी’ म्हटले आहे. आतापर्यंत या मालिकेत बुमराहने ऑस्ट्रेलिया फलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. पण दुसऱ्या बाजूने गोलंदाजी अपेक्षेप्रमाणे झाली नाही.
रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी न्यूज़.कॉम.एयूशी बोलताना सांगितले की, “मालिकेच्या टप्प्यावर मला वाटते की भारत आघाडीवर आहे. पर्थ, ॲडलेड आणि ब्रिस्बेनमध्ये खेळल्यानंतर कोणताही विदेशी संघ 1-1 असा बरोबरीत असेल, तर यातून प्रेरणा घेता येईल. बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी मालिका बरोबरीत राहणे ही भारतासाठी चांगली परिस्थिती आहे. माझा विश्वास आहे की भारत आत्मविश्वासाने मैदानात उतरू शकतो.”
ऑस्ट्रेलियाच्या कमकुवतपणाविषयी रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले, “सध्या ऑस्ट्रेलियाची टॉप ऑर्डर मला कमकुवत वाटत आहे. याचा फायदा भारताने घेतला आहे आणि भविष्यातही त्याचा फायदा होईल. मालिका सध्या बरोबरीत आहे. जसप्रीत बुमराहने एकट्याच्या दमावर भारताला या स्थानावर नेले आहे.”
या मालिकेत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ऑस्ट्रेलियासाठी भिंत ठरला आहे. त्याने पर्थमध्ये कर्णधार म्हणून 8 विकेट्स घेतल्या आणि तो सामन्याचा हिरो ठरला. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात बुमराहने पुन्हा धमाकेदार गोलंदाजी करत 4 विकेट्स घेतल्या. ब्रिस्बेनमध्ये या स्टार गोलंदाजाने शानदार पुनरागमन करत 9 विकेट्स घेत सामना अनिर्णित राखण्यात मोलाची भूमिका बजावली.
महत्त्वाच्या बातम्या-
बाॅक्सिंग डे कसोटीसाठी भारत-ऑस्ट्रेलिया सज्ज! जाणून घ्या प्लेइंग 11, पिच रिपोर्टसह सर्वकाही
ख्रिसमस दिवशी एमएस धोनी बनला सांताक्लाॅज! धोनीचा नवा लूक एकदा पाहाच
आयसीसी कसोटी क्रमवारीत रिषभ पंतला मोठा फटका! टाॅप-10 मधून बाहेर