---Advertisement---

भारीच की! श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघाला ‘द वॉल’ राहुल द्रविडचं देणार प्रशिक्षण?

On: गुरूवार, मे 20, 2021 12:47 PM
---Advertisement---

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम आणि रोमांचक सामन्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. हा सामना १८ ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर रंगणार आहे. या लढतीत भारत आणि न्यूझीलंड हे बलाढ्य संघ आमने सामने असणार आहेत. त्यानंतर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर आणि इंग्लंड दौऱ्यापुर्वी भारतीय संघ श्रीलंका संघाविरुद्ध जुलै महिन्यात मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. तसेच या संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी माजी भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविड यांना देण्यात आल्याचे समजत आहे.

भारतीय संघाची पहिली तुकडी जूनच्या सुरुवातीला इंग्लंडच्या दिशेने रवाना होणार आहे. यामध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या वरिष्ठ खेळाडूंचा समावेश असणार आहे. तसेच जुलै महिन्यात भारतीय संघाची दुसरी तुकडी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर ३ टी-२० सामने आणि ३ वनडे सामने खेळले जाणार आहेत.

या संघात आयपीएल स्पर्धेत आणि देशांतर्गत झालेल्या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यात येऊ शकते. तसेच या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद राहुल द्रविड यांना देण्यात येण्याची दाट शक्यता आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने एएनआयला दिली आहे.

त्या अधिकाऱ्याने सांगितले की, “जून ते सप्टेंबर या कालावधीत भारतीय संघाचे सर्व प्रशिक्षक एका तुकडीसह इंग्लंडमध्ये असणार आहेत. अशात युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या दुसऱ्या तुकडीसाठी द्रविड हे प्रशिक्षक म्हणून योग्य असतील. कारण त्यांनी भारत अ संघातील बऱ्याचशा युवा खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे. यामुळे श्रीलंका दौऱ्यातील युवा खेळाडूंना जास्तीचा फायदा होईल.” असे असले तरीही अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

राहुल द्रविड हे अंडर १९ आणि इंडिया ए संघाचे मार्गदर्शक राहिले आहेत. तसेच पृथ्वी शॉ आणि रिषभ पंत यांसारखे खेळाडू राहुल द्रविडच्या देखरेखीखालीच घडले आहेत. शिखर धवन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांसारखे खेळाडू श्रीलंका दौऱ्यावर जाऊ शकतात. यातील बऱ्याचशा खेळाडूंना राहुल द्रविड यांचे मार्गदर्शन लाभल्याने त्यांच्यासाठी हा निर्णय सोईचा ठरेल.

असा असेल भारताचा श्रीलंका दौरा

वनडे मालिका
१)पहिला वनडे सामना -१३ जुलै
२)दुसरा वनडे सामना-१६ जुलै
३)तिसरा वनडे सामना -१९ जुलै

टी-२० मालिका
१)पहिला टी -२० सामना -२२ जुलै
२) दुसरा टी -२० सामना -२४ जुलै
३) तिसरा टी -२० सामना -२७ जुलै

महत्त्वाच्या बातम्या-

मैदानात पुन्हा एकदा घुमणार ‘इंडिया.. इंडिया..’चा गजर, WTC फायनलमध्ये ‘इतक्या’ प्रेक्षकांना मिळणार प्रवेश!

एवढा मोठा फरक! संपूर्ण भारतीय महिला संघाचे वार्षिक मानधन आहे एकट्या कोहलीच्या पगारापेक्षाही कमी

काय प्रतिभा आहे! आंधळे असूनही ‘हे’ ४४ वर्षीय समालोचक त्यांच्या वाणीतून दर्शकांना करतात मंत्रमुग्ध

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---