भारताचे माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी बुधवारी(३० डिसेंबर) चेन्नई येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पुढीलवर्षी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वीच शिवरामकृष्णन यांनी तामिळनाडू पक्षाचे प्रमुख डॉ. एल. मुरुगन आणि राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
लक्ष्मण शिवरामकृष्णन भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा बुधवारी सकाळपासूनच सुरु होती. त्यात भाजप नेत्या खुशबू सुंदर यांनी बुधवारी ट्विट केले होते की त्यांचे दोन चांगले मित्र भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या ट्विटनंतर लक्ष्मण शिवरामकृष्णन भाजपमध्ये प्रवेश करणार या चर्चेला आणखी जोर चढला होता.
Two of my very good friends are joining @BJP4India today in chennai in the presence of our #TN Prez @Murugan_TNBJP avl and our respected Gen Sec @CTRavi_BJP avl. Will let you know in sometime till then keep guessing. 🙏🙏🙏😊😊😊
— KhushbuSundar (Modi ka Parivaar) (@khushsundar) December 30, 2020
लक्ष्मण शिवरामकृष्णन यांच्याआधीही अनेक क्रिकेटपटूंनी राजकारणात प्रवेश केला आहे. याचे ताजे उदाहरण गौतम गंभीर असून तो सध्या पूर्व दिल्लीमध्ये खासदार आहे.
लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी वयाच्या १७ व्या वर्षी १९८३ ला वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ९ कसोटी आणि १६ वनडे सामने खेळले. यात त्यांनी अनुक्रमे २६ आणि १५ विकेट्स घेतल्या.
याबरोबरच ते देशांतर्गत क्रिकेट बडोदा आणि तमिळनाडूकडून खेळले. त्यांनी ७६ प्रथम श्रेणी सामने खेळताना १५४ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर त्यांनी अ दर्जाच्या ३३ सामन्यात ३७ विकेट्स घेतल्या आहे. या शिवाय प्रथम श्रेणीमध्ये त्यांच्यानावावर ५ शतके आणि ३ अर्धशतकांचीही नोंद आहे.
त्यांनी क्रिकेटमध्ये खेळाडू म्हणून कारकिर्द घडवल्यानंतर समालोचक म्हणूनही काम केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
डेविड वॉर्नरचे पुनरागमन! असा आहे भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ
अटीतटीच्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत न्यूझीलंडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
जर रोहितचे तिसऱ्या कसोटीत पुनरागमन झाले तर ‘या’ खेळाडूला बसावे लागेल बाहेर