---Advertisement---

इंग्लंड दौऱ्यानंतर विराट स्वत: ‘या’ धुरंधराकडे भारताचे नेतृत्त्वपद सोपवणार, माजी खेळाडूची भविष्यवाणी

On: शुक्रवार, मे 28, 2021 10:32 AM
Virat-Kohli-Rohit-Sharma
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्यानंतर भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी विराट कोहलीकडे देण्यात आली होती. विराट कोहली फलंदाज म्हणून हिट आहेच. परंतु गेल्या काही वर्षात त्याने यशस्वी कर्णधार म्हणून देखील आपली ओळख निर्माण केली आहे. परंतु विराटनंतर भारतीय संघाचा भावी कर्णधार कोण असेल? असा प्रश्न अनेकदा उपस्थित होत असतो.

अनेकदा क्रिकेट पंडितांनी आणि आजी-माजी क्रिकेटपटूंनी याबाबत आपली मते मांडली आहेत. आता माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज किरण मोरे यांनी भारतीय संघाच्या भावी कर्णधाराविषयी भविष्यावाणी केली आहे.

भारतीय संघासाठी ४९ कसोटी आणि ९४ वनडे सामने खेळणारे माजी यष्टीरक्षक फलंदाज किरण मोरे यांनी रोहित शर्माला पसंती दर्शवली आहे. त्यांनी म्हटले की, “आगामी इंग्लंड दौऱ्यानंतर म्हणजेच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारताचा पुढील कर्णधार कोण असेल, हे स्पष्ट होईल. याखेरीज असेही होऊ शकते की, विराट स्वत:च कोणत्यातरी एका स्वरुपातील कर्णधारपद रोहितला सोपवेल.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “मला विश्वास आहे की, रोहितला लवकरच भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. विराट आणखी किती दिवस वनडे आणि टी-२० मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. जेव्हा भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावरून परतेल; तेव्हा याविषयी निर्णय घाव्या लागेल. तसेच या विषयावर चर्चाही होऊ शकते. ”

“क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपामध्ये एकट्यानेच भारतीय संघाचे नेतृत्व करणे सोपे नाही. कारण नेतृत्त्व करण्याबरोबर तुम्हाला चांगली कामगिरी देखील करावी लागते. मला तर असे वाटते की, एक वेळ अशी येईल जेव्हा विराट स्वतः म्हणेल की, बस आता खूप झाले, रोहितला संघाचे नेतृत्व करू द्या,” असे मोरे यांनी शेवटी म्हटले.

रोहित शर्मा आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधीत्व करतो. या स्पर्धेत रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने ५ वेळेस जेतेपद पटकावले आहे. रोहितने याबाबतीत अगदी एमएस धोनीलाही मागे टाकले आहे. धोनीने आतपर्यंत ३ वेळेस आयपीएलचे जेतेपद पटकावले आहेत. तसेच रोहित धर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने निदाहास ट्रॉफीदेखील आपल्या नावावर केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

किती ते प्रेम! केएल राहुलला पुन्हा फिट पाहून प्रेयसी अति आनंदित, दिली लक्षवेधी प्रतिक्रिया

‘आई शप्पथ तो बाद आहे’; जेव्हा विकेटसाठी भारतीय गोलंदाजाने पंचांकडे केला होता बालहट्ट

सोन्यासारखी संधी! केवळ ‘इतक्या’ विकेट्स अन् अश्विन बनेल टेस्ट चॅम्पियनशीपचा अव्वल गोलंदाज 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---