भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जात आहे. दरम्यान दोन्ही संघातील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन, गाबाच्या मैदानावर रंगला आहे. या सामन्यात भारतीय संघ पिछाडीवर आहे. या सामन्यात भारताची फलंदाजी फ्लाॅप ठरली. दरम्यान, भारताचे माजी दिग्गज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज ‘मोहम्मद सिराज’वर (Mohammed Siraj) नाराज होताना दिसले. या बातमीद्वारे आपण त्यामागील कारण जाणून घेऊया.
वास्तविक, भारतीय डावाच्या 62व्या षटकात मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) फलंदाजी करत होते. षटकाच्या चौथ्या चेंडूवर जडेजाने 1 धाव घेतली आणि सिराज स्ट्राईकवर आला. यानंतर पुढच्या चेंडूवर सिराजने जोखीमपूर्ण धाव घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्याच्यासोबत खेळपट्टीवर असलेला जडेजाही नाराज दिसला. दरम्यान एकेरी धाव पूर्ण होऊ शकली नाही, पण थेट थ्रो झाला असता तर कदाचित भारताला आणखी 1 विकेट गमवावी लागली असती. यामुळे सुनीवर गावसकर सिराजवर नाराज झाले.
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सुनील गावसकर (Sunil Gavaskar) म्हणाले, “आताही ते क्रिझच्या मधोमध बोलत आहेत. इथे काय चाललंय? षटकात 1 चेंडू शिल्लक आहे. तुम्हाला फक्त क्रिजवर राहायचे आहे. तिथे धाव नाहीये. तुम्ही 9 नंबरचे फलंदाज आहात. तुम्हाला संघाबद्दल विचार करावा लागेल. तुम्ही जोखीमपूर्ण धाव घेण्याचा विचार करू शकत नाही.”
सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर 5 दिवसांचा खेळ संपल्यानंतरही भारतीय संघ या सामन्यात मागे आहे. चौथ्या दिवशी खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने 252/9 धावा केल्या होत्या. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि आकाश दीप (Akash Deep) संघासाठी नाबाद परतले. दोघांनी 10व्या विकेटसाठी नाबाद 39 धावांची भागीदारी रचली.
‘आकाश दीप’ने (Akash Deep) 31 चेंडूत मदतीने 27 धावा केल्या. दरम्यान त्याने 2 चौकारांसह 1 षटकार मारला. तर ‘जसप्रीत बुमराह’ने (Jasprit Bumrah) 27 चेंडूत 10 धावा केल्या. दरम्यान त्याने 1 षटकार मारला. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघ 193 धावांनी मागे आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS; पाचव्या दिवशी कसे असणार ब्रिस्बेनचे हवामान? पाऊस घालणार खोळंबा?
शिखर धवनचे गोलंदाजांवर वर्चस्व, झळकावले तुफानी शतक!
जसप्रीत बुमराह, आकाश दीपच्या जोडीने रचला इतिहास! 21व्या शतकाच प्रथमच असे घडले






