ऑस्ट्रेलिया महिला संघ भारतीय दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाला भारतीय संघाविरुद्ध 5 सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे. यातील पहिला टी20 सामना पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने 9 विकेट्सने आपल्या खिशात घातला होता. यानंतर आता मालिकेतील दुसरा टी20 सामना मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील क्रिकेट स्टेडिअमवर खेळला गेला. मात्र, मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाकडून वेगवान गोलंदाज किम गार्थ हिने पदार्पण केले होते. विशेष म्हणजे, यापूर्वी तिने आयर्लंड संघाकडून तब्बल 10 वर्षे क्रिकेट खेळले आहे.
भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाकडून खेळला पहिला सामना
भारतीय दौऱ्यावर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया संघात निवडली गेलेल्या किम गार्थ (Kim Garth) हिने पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून तिचा पहिला सामना खेळला. त्यापूर्वी तिने आयर्लंड महिला संघाकडून 51 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. तिने आयर्लंडसाठी फक्त 14 वर्षांच्या वयात 2010मध्ये पदार्पण केले होते. मात्र, आता 12 वर्षांनंतर तिने 26 वर्षांच्या वयात ऑस्ट्रेलिया संघाकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळला. विशेष म्हणजे, ती दोन देशांकडून क्रिकेट खेळणारी पहिली ऑस्ट्रेलियन महिला खेळाडू बनली.
We've got a debutant! Massive congrats to Kim Garth who will tonight become the first Aussie woman to play cricket for two countries.
Unreal #INDvAUS pic.twitter.com/VE0J3s5vOt
— Australian Women's Cricket Team 🏏 (@AusWomenCricket) December 9, 2022
The dream becomes a reality 💚
Kim Garth receives Aussie T20I cap No.58! #INDvAUS pic.twitter.com/3cVGkxcKtP
— Australian Women's Cricket Team 🏏 (@AusWomenCricket) December 9, 2022
हरमनप्रीतची घेतली होती विकेट
किम गार्थ हिने ऑस्ट्रेलिया संघाकडून भारताविरुद्ध पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी केली होती. तिने 3 षटके गोलंदाजी करताना 27 धावा देत एक विकेट घेतली होती. विशेष म्हणजे, तिने भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिची विकेट घेतली होती.
First wicket in the green and gold for @kim_garth 🥹
cc @VicStateCricket pic.twitter.com/ZY3s43VU1k
— Australian Women's Cricket Team 🏏 (@AusWomenCricket) December 9, 2022
This is special! 🥹
Go behind the scenes in Mumbai and see the moment our coach Shelley tells Kim Garth she'll be making her Aussie debut, before she's handed her cap by Ellyse Perry! #INDvAUS pic.twitter.com/MuycqIP3Tt
— Australian Women's Cricket Team 🏏 (@AusWomenCricket) December 10, 2022
किम गार्थची कारकीर्द
ऑस्ट्रेलियाकडून खेळण्यापूर्वी किम गार्थ आयर्लंड (Kim Garth Ireland) संघाकडून 51 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात खेळली होती. यामध्ये तिने 42 विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. तसेच, तिने आयर्लंडकडून 34 वनडे सामने खेळताना 23 विकेट्सही घेतल्या होत्या. किम हिने फलंदाजीतही चांगली कामगिरी केली आहे. तिने तळात फलंदाजी करताना आयर्लंडसाठी अनेकदा महत्त्वपूर्ण खेळी साकारली आहे. तिने टी20त 448 आणि वनडेत 762 धावा केल्या आहेत. टी20त तिची सर्वोत्तम धावसंख्या ही नाबाद 72 इतकी आहे, तर वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 51 इतकी आहे. अशात ऑस्ट्रेलियाकडून खेळताना किम गार्थ आगामी सामन्यात कशी कामगिरी करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (former ireland international kim garth makes debut australia against india in t20i series read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून रोहित शर्माचा पत्ता कट, ‘या’ धुरंधराची संघात एन्ट्री
ईशानच्या द्विशतकानंतर संपणार ‘या’ खेळाडूची कारकीर्द? दिनेश कार्तिकचे मोठे वक्तव्य