पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू बिली अब्दुल्लाचं (billy abdullah) वयाच्या 88व्या वर्षी निधन झालं. शुक्रवारी (12 जुलै) रोजी त्याचं निधन झालं. कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा तो पाकिस्तानचा पहिला फलंदाज होता.
ऑक्टोबर 1964 मध्ये कराचीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात त्यानं 330 चेंडूत 166 धावा ठोकल्या होत्या. यादरम्यान त्यानं यष्टीरक्षक फलंदाज अब्दुल कादिरसोबत (Abdul Qadir) 249 धावांची भागीदारी केली होती. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 2 पदार्पण खेळाडूंमधील ही सर्वात मोठी भागीदारी आहे.
यानंतर यासिर हमीद, फवाद आलम, जावेद मियांदाद, उमर अकमल, अझहर महमदू, अली नक्वी, मोहम्मद वसीम, आबिद अली, युनूस खान आणि तोफीक उमर या फलंदाजांनी पाकिस्तानकडून पदार्पणातच शतकं झळकावली आहेत. इंग्लिश काउंटी वॉरविकशायरमध्ये अब्दुल्लासोबत काउंटी क्रिकेट खेळणाऱ्या डेनिस एमिसनं या खेळाडूला श्रद्धांजली वाहिली.
तो म्हणाला, “तो एक चांगला क्रिकेटर होता. महान खेळाडूंपैकी एक. आम्ही एकत्र खूप मजेशीर वेळ घालवला आहे. तो कधी कधी खूप खोड्या करायचा.”
बिली अब्दुल्लानं (billy abdullah) पाकिस्तानकडून 4 कसोटी सामने खेळले होते. त्यामध्ये त्यानं 31.62 च्या सरासरीनं 253 धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं 417 सामन्यात 17,078 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 27.28 होती. आपल्या कारकिर्दीत त्यानं 22 शतकं आणि 82 अर्धशतकं झळकावली. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 462 विकेट्स घेतल्या. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्यानं 64 सामन्यांमध्ये 829 धावा केल्या होत्या. यासोबतच त्यानं 84 विकेट्सही घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
डेव्हिड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार का? निवडकर्त्यांनी घेतला मोठा निर्णय
“यापुढे टेनिसवर एकच खेळाडू…” कार्लोस अल्कारेजच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया व्हायरल
राधिकाला मिठी मारली, अनंत अंबानीला सल्ला दिला; नव्या जोडप्यासाठी ‘माही’ची खास पोस्ट