मुंबई । संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने घेरले आहे. भारतात कोरोना बाधितांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. नुकतेच बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले आहे. त्यांना शनिवारी रात्री मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
77 वर्षीय अमिताभ बच्चन यांनी स्वत: कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली. त्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली.
भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने ट्विट करत लिहले की, “ही रात्र अवघड आहे. चेतन चौहान यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे आणि आता बिग बी यांनाही. सर आपण लवकर लवकर बरे व्हा.”
Chetan Chauhan ji is also tested positive for #COVIDー19. Sending best wishes in his direction too…get well soon, sir. Tough night this one…Big B and Chetan Ji.
— Aakash Chopra (@cricketaakash) July 11, 2020
अमिताभ बच्चन लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी त्यांच्या फॅन्सनी देखील प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. बिग बी यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी कळताच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने देखील ट्विट करत लिहिले की, “अमिताभ जी आपण लवकर बरे व्हा.”
Get well soon Amit Ji @SrBachchan Prayers for a speedy recovery. https://t.co/s2VIq1SRh5
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) July 11, 2020
असे असले तरी पाकिस्तानमधून अमिताभ यांना बर होण्यासाठी शुभेच्छा येत असताना भारतीय कर्णधार विराट कोहलीने शुभेच्छा न दिल्यामुळे त्याला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी इरफान पठाण आणि सुरेश रैना यांनी देखील प्रार्थना केली.
Wishing for your speedy recovery Sir🙏
— Irfan Pathan (@IrfanPathan) July 11, 2020
Get well soon Sir 🕉🙏🙏
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) July 11, 2020
अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले की, “मला कोरोनाची लागण झाली आहे आणि मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. हॉस्पिटल प्रशासन सूचना देत आहे. कुटुंबातील सदस्य आणि स्टाफ यांची ही टेस्ट केली जात आहे. रिपोर्टची वाट पाहत आहे. मागील दहा दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतःची टेस्ट करावी.”
T 3590 -I have tested CoviD positive .. shifted to Hospital .. hospital informing authorities .. family and staff undergone tests , results awaited ..
All that have been in close proximity to me in the last 10 days are requested to please get themselves tested !— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 11, 2020
सध्या भारताता कोरोना रुग्णांची संख्या 8 लाखांच्या पुढे गेली आहे. तरी यातील 5 लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. तर अडिच लाखांहून अधिक रुग्णांवर सध्या उपचार चालू आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
भारताचा हा दिग्गज क्रिकेटपटूही आढळला कोरोना पॉझिटिव्ह
कोरोनामुळे ‘या’ देशातील क्रिकेटपटूंवर आली उपासमारीची वेळ
लॉकडाऊनमध्ये पैशांची कमतरता, भारतीय दिग्गज खेळाडू विकणार बीएमडब्लू कार