भारत विरुद्ध इंग्लंडच्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस संपला. पहिल्या सामन्यात पराभव पत्कराव्या लागलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात मात्र जोमाने पुनरागमन केले आहे. चौथ्या डावात इंग्लंडला भारताने ४८२ धावांचे लक्ष्य दिले असून तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाहुण्या संघाचे ५३ धावांवर ३ गडी देखील बाद केले आहेत. त्यामुळे भारताने या सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.
भारताच्या या वर्चस्वात फिरकीपटू आर अश्विनने महत्वाची भूमिका बजावली. त्याने पाहिलंय डावात गोलंदाजी करतांना पाच बळी तर घेतलेच. मात्र त्यांनतर दुसऱ्या डावात फलंदाजी करतांना शतक देखील झळकावले. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर इतर फलंदाज अपयशी ठरत असताना अश्विनने बहारदार फलंदाजीचा नमुना पेश केला. त्याच्या या शतकी खेळीनंतर अनेक माजी दिग्गजांनी त्याचे भरभरून कौतुक केले आहे.
ट्विटरवर आला अभिनंदनाचा पूर
फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर दोन्ही संघांचे फलंदाज अडखळत असताना आर अश्विनने कसलेल्या फलंदाजासारखी आपली खेळी उभारली. १४१ चेंडूत १०६ धावा करताना त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांना निष्प्रभ केले. त्याच्या या खेळीने प्रभावित झालेल्या अनेक आजी-माजी खेळाडूंनी ट्विट करत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेनने “चेन्नईचा सुपर किंग! अश्विनचे लाजवाब शतक”, असे म्हणत भारताच्या शतकवीराचे अभिनंदन केले. तर इंग्लंडचाच माजी कर्णधार मायकेल वाॅनने “आर अश्विनची अप्रतिम खेळी. भारताकडे अशा परिस्थितीसाठी अनेक गुणवान खेळाडू आहेत. उच्च दर्जाचा खेळ”, अशा शब्दात अश्विनचे कौतुक केले.
Well played Chennai’s Super King !! Brilliant 100 from Ravi Ashwin …
— Nasser Hussain (@nassercricket) February 15, 2021
Ruthless performance by @ashwinravi99 !!! India have so many more skilled players for these conditions .. High class .. #INDvENG
— Michael Vaughan (@MichaelVaughan) February 15, 2021
भारताचा माजी शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणनेही अश्विनची पाठ थोपटली आहे. लक्ष्मण ट्विट करत म्हणाला, “मोठ्या खेळी कधीच तुम्हाला सूट होणाऱ्या परिस्थितीत उभारल्या जात नाहीत. त्यामुळे अश्विनची ही खेळी महान आहे. तसेच या खेळपट्टीवर धावा करणे अवघड आहे, पण अशक्य नक्कीच नाही, हे अश्विनने दाखवून दिले. निव्वळ आदर.”
Great things never come from comfort zone and this is great knock from @ashwinravi99 Also showed it’s going to be hard batting on this pitch but hard does not mean impossible. Nothing but RESPECT Ash🙏 #INDvsENG pic.twitter.com/1S2Wdiv83Y
— VVS Laxman (@VVSLaxman281) February 15, 2021
याशिवाय माजी सलामीवीर वसीम जाफर, दिनेश कार्तिक, मोहम्मद कैफ या खेळाडूंनी देखील अश्विनची प्रशंसा करणारे ट्विट केले आहेत.
Let me tell you a Kutty story #Ashwin #INDvsENG pic.twitter.com/K6hbfjhTOS
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) February 15, 2021
Want a crash course in batting and bowling on spin-friendly pitches? Meet Ashwin Sir. Tutorials available in Tamil, Hindi and English. New batch starting after this series, special discount for those who want to learn and not find excuses
— Mohammad Kaif (@MohammadKaif) February 15, 2021
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग! भारताच्या गुणवान यष्टीरक्षक-फलंदाजाची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती
सिंग इज किंग ! सहा वर्षापासून युवराजचा आयपीएलमधील हा विक्रम कोणीही मोडू शकला नाही
इसके मुंह पर भी डाल सकता है..! चेन्नई कसोटीतील पंतची कॉमेंट्री तूफान व्हायरल, बघा व्हिडिओ