जगातील सर्वात मोठी लीग म्हणजे इंडिअन प्रीमिअर लीग (आयपीएल). आइपीएलमध्ये जगातील प्रसिद्ध खेळाडूंचा समावेश असतो. आयपीएलमध्ये दरवर्षी कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते. त्यामुळे संपूर्ण जगातील महागडी लीग स्पर्धा म्हणून आयपीएलला पाहिले जाते. दरम्यान, आयपीएलसंदर्भातच माजी रॉ एजंट एनके सूद यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे.
क्रिकेटपटूंचे शानदार विक्रम, चुरशीचे सामने आणि इतर मुद्द्यांमुळे आयपीएल चर्चेत असते. काहीवेळा स्पॉट फिक्सिंगसारख्या नकोशा घटनांमुळेही आयपीएलची चर्चा झाली आहे. अशात माजी रॉ एजंट एनके सूद यांनी आयपीएलबद्दल मोठा उलगडा केला आहे. आयपीएलदरम्यान क्रिकेटपटूंच्या पत्नी चक्क ड्रग्सचे सेवन करत असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे.
ते म्हणाले की, ‘आयपीएलमध्ये अंडरवर्ल्डचा समावेश आहे. जेव्हा सामने सुरु असतात तेव्हा खेळाडूंच्या पत्नी ड्रग्सचे सेवन करतात. त्या ड्रग्स घेण्यासाठी शौचालायचा वापर करतात. ही माहिती मला त्यावेळेस तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने दिली होती. तसेच आयपीएलमध्ये बरेचसे सामनेही फिक्स असतात. आयपीएलमध्ये सट्टेबाजी खूप मोठ्या प्रमाणात चालते. या सट्टा मार्केटमध्ये बंटी सजदेहचा खूप मोठा हात आहे.’
बंटी सजदेह, रितिका सजदेहचा भाऊ म्हणजे रोहित शर्माच्या पत्नीचा भाऊ आहे. त्यानेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे लग्न जुळवून दिले होते. या सर्व प्रकरणाबाबत अजून बीसीसीआयकडून काहीच माहिती देण्यात आली नाही. आयपीएलला घेऊन यापूर्वी सुद्धा खूप विवाद झाले आहेत. आता माजी रॉ एजंटने असे गंभीर आरोप केल्यामुळे बीसीसीआय प्रश्नांच्या कचाट्यात सापडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आजच्याच दिवशी ८ वर्षांपुर्वी ‘धोनी आणि कंपनी’ने रचला होता इतिहास, बनला होता एकमेवाद्वितीय कर्णधार
विंडीजला तिहेरी धक्का, कसोटी मालिकेत ०-२ ने धुव्वा उडाल्यानंतर आयसीसीने ठोठावला मोठा दंड
जसप्रीत बुमराहकडून झाली ‘मोठी चूक’, लाईव्ह सामन्यात मैदान सोडून जावं लागलं बाहेर