---Advertisement---

इकडं शुबमनने शतक ठोकलं अन् तिकडं विराटकडून आली जगातली भारी रिऍक्शन, फोटो शेअर करत म्हणाला…

On: शुक्रवार, फेब्रुवारी 3, 2023 10:02 AM
Shubman-Gill-And-Virat-Kohli
---Advertisement---

भारतीय संघाचा स्टार सलामीवीर शुबमन गिल याने टी20 क्रिकेटमध्ये शतक झळकावत स्वत:ला सर्व क्रिकेट प्रकारातील खेळाडू म्हणून सिद्ध केले आहे. यापूर्वी अनेक आजी-माजी खेळाडूंनी भारताच्या टी20 संघातील त्याच्या जागेविषयी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, गिलने बुधवारी (दि. 1 फेब्रुवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसऱ्या टी20 सामन्यात नाबाद 126 धावांची खेळी करत टीकाकारांची बोलती बंद केली आहे. गिलच्या शतकानंतर अनेक दिग्गज खेळाडूही त्याच्यावर फिदा झाले. यामध्ये विराट कोहली याच्या नावाचाही समावेश आहे. विराटने गिलला थेट भारताचे भविष्य म्हटले आहे.

काय म्हणाला विराट?
सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी (दि. 2 फेब्रुवारी) विराट कोहली (Virat Kohli) याने शुबमन गिल (Shubman Gill) याच्यासाठी इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली. त्याने या स्टोरीमध्ये स्वत:सोबत गिलचा फोटो लावला आहे. या फोटोसोबतच त्याने गिलसाठी ‘तारा’ (Star) या शब्दाचा वापर केला आहे. त्याने या फोटोत चांदणीचा इमोजीही वापरला आहे. विराटने गिलला भारताचे भविष्य म्हणत लिहिले आहे की, “भविष्य इथे आहे.”

Virat-Kohli-Story
Photo Courtesy: Instagram/virat.kohli

तब्बल 200च्या स्ट्राईक रेटने चोपल्या होत्या धावा
अहमदाबाद टी20 क्रिकेटमध्ये शुबमन गिल याने 63 चेंडूत 126 धावांची खेळी साकारली होती. या धावा चोपताना त्याने 7 षटकार आणि 12 चौकारांचा पाऊस पाडला होता. त्याच्या या खेळीमुळे भारताने न्यूझीलंडसमोर तब्बल 235 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाचा डाव 12.1 षटकात अवघ्या 66 धावांवर संपुष्टात आला होता. त्यामुळे भारताने हा सामना 168 धावांनी खिशात घातला होता. तसेच, मालिकाही 2-1ने जिंकली. गिलला या निर्णायक सामन्यात केलेल्या कामगिरीसाठी ‘सामनावीर’ पुरस्कारानेही गौरवण्यात आले.

जबरदस्त फॉर्ममध्ये गिल
शुबमन गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी वनडे मालिकेतही दमदार फलंदाजी केली होती. त्या मालिकेत त्याने 3 सामने खेळताना 180च्या सरासरीने 360 धावा केल्या होत्या. तसेच, टी20 मालिकेत त्याने 3 सामन्यात 72च्या सरासरीने 144 धावा केल्या. अशाप्रकारे दोन्ही मालिकेत गिलने 360 आणि 144 अशा एकूण 6 डावांमध्ये 504 धावा केल्या. तसेच, तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 1 हजार धावा करणारा भारतीय फलंदाजही बनला आहे. विशेष म्हणजे, वनडेत त्याने द्विशतही झळकावले होते. वनडेत त्याने 73.76च्या सरासरीने धावा चोपल्या आहेत. (former skipper virat kohli calls shubman gill team india future star shared a picture on instagram ind vs nz t20)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतून कार्तिकचे ‘पदार्पण’, स्वत:च ट्वीट करत दिली खुशखबर
धक्कादायक! शुबमन गिलच्या खोलीत घुसून किशनने वाजवली कानाखाली; चहलही बघतच राहिला; व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---