नवी दिल्ली । वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज मार्लोन सॅम्युएल्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. सॅम्युएल्सने डिसेंबर 2018 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यांच्या निवृत्तीच्या वृत्ताला वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने बुधवारी (4 नोव्हेंबर) दुजोरा दिला.
जूनमध्येच दिली होती निवृत्तीची माहिती
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे सीईओ ग्रेव्ह यांनी ईएसपीएन क्रिकइन्फो या वेबसाईटशी बोलताना सांगितले की, “सॅम्युएल्सने बोर्डाला जून महिन्यातच निवृत्त होत असल्याचे सांगितले होते.”
सन 2018 मध्ये खेळला शेवटचा सामना
त्याने डिसेंबर 2018 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. 39 वर्षीय सॅम्युएल्सने वेस्ट इंडिजकडून एकूण 71 कसोटी, 207 वनडे आणि 67 टी20 सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 11 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत, तर गोलंदाजीमध्ये 150 हून अधिक बळीही घेतले आहेत.
‘हा’ विक्रम करणारा तो एकमेव खेळाडू
सॅम्युएल्सने शानदार फलंदाजी करत वेस्ट इंडीज संघाला दोन टी20 विश्वचषकातील अंतिम सामन्यात विजय मिळवून दिला होता. 2012 विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने 56 चेंडूत 78 धावांची खेळी केली होती. सन 2016 मध्ये कोलकाता येथे झालेल्या टी20 विश्वचषकातील अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध 85 धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. आयसीसी विश्वचषकच्या अंतिम सामन्यात दोन वेळा सामनावीर म्हणून निवड होणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे.
स्टोक्स -सॅम्युएल्स वाद
इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने केलेल्या विनोदामुळे मर्लोन सॅम्युएल्सला राग आला आणि वाद पेटला. बेन स्टोक्सने अलीकडेच असे सांगितले होते की आयपीएलमध्ये क्वारंटाईनमध्ये राहणे किती आव्हानात्मक आहे. त्याचा शत्रू मर्लोन सॅम्युएल्सनेसुद्धा या परिस्थितीचा सामना करावा असे वाटत नाही. त्यानंतर सॅम्युएल्सला राग आला आणि सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याने स्टोक्स आणि त्याच्या पत्नीवर अश्लील भाषेत टीका केली होती.
सॅम्युएल्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द
वेस्ट इंडिजकडून खेळलेल्या 71 कसोटी सामन्यात सॅम्युएल्सने 3917 धावा केल्या आहेत. 207 वनडे सामन्यात या फलंदाजाने 5606 धावा केल्या असून त्यात 10 शतके आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे. 67 टी -20 सामन्यात त्याने 1611 धावा केल्या आहेत. टी20 विश्वचषकातील अंतिम सामन्यात सॅम्युएल्सने उत्कृष्ट कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
-नादच खुळा! हैदराबादने ‘या’ विक्रमात केली मुंबई- चेन्नईसारख्या बलाढ्य संघांची बरोबरी
-मानलं पाहिजे! पराभूत होऊनही मुंबईच्या नावावर ‘मोठ्या’ विक्रमाची नोंद
-बिगुल वाजलं! प्ले ऑफमध्ये चार संघांचे स्थान निश्चित; ‘असे’ असतील क्वालिफायर आणि एलिमिनेटरमधील सामने
-‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
-IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
-वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का