इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाच्या तोंडचा घास पळाला आहे. पावसामुळे पाचव्या दिवसाचा खेळ रद्द करुन सामना अनिर्णीत घोषित करावा लागला. सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला पाचव्या दिवशी केवळ 157 धावांची आवश्यकता होती आणि संघाकडे 9 विकेट्स शिल्लक होत्या. यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या नविम नियमांप्रमाने दोन्ही संघांना 4-4 गुण देण्यत आले आहेत. सामना हातातून निसटल्यामुळे भारताची निराशा झाली. असे असले तरीही, या सामन्यातून भारतीय संघाच्या चार जमेच्या बाजू दिसत आहेत.
भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला केले सर्वबाद
पहिल्या कसोटीत विजयाच्या अगदी जवळ असताना पावसामुळे संघाला हातातील सामना गमवावा लागला. यामुळे कर्णधार विराट कोहली, सपूर्ण संघ आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांची निराशा झाली. मात्र, या सामन्यात भारतीय संघाच्या काही जमेच्या बाजूही दिसल्या आहेत. भारतीय संघाने इंग्लंडला या सामन्यात प्रत्येक गोष्टीत मागे सोडले आहे. जसप्रीत बुमराहाने (9 विकेट्) दोन्ही डावात उत्तम कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय संघाने सामन्यादरम्यान दोन्ही डावात इंग्लंडला सर्वबाद केले. इंग्लंडमध्ये हे चित्र कमी प्रमाणात पाहायला मिळले आहे. शार्दुल ठाकुर आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 4 विकेट्स आणि मोहम्मद सिराजने 3 विकेट्स मिळवल्या आहेत.
पराजयाने नाही झाली सुरूवात
भारतीय संघासाठी आणखी एक सकारात्मक बाजू या सामन्यात दिसली. भारताने 2007 आणि 2014 ची मालिका सोडली, तर इंग्लंडमध्ये नेहमीच मालिकेतील पहिला सामना गमावलेला आहे. आजवरचा इतिहास पाहिला तर संघासाठी ही सुरूवात चांगली मानली जात आहे.
केएल राहुलची उकृष्ट फलंदाजी
इंग्लंडमधील 2018 च्या खराब प्रदर्शनामुळे राहुलने भारतीय कसोटी संघातून स्थान गमावले होते. त्यानंतर त्याला स्वदेशात झालेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतही संघात स्थान मिळाले नव्हते. मात्र, जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर काही चेंडू त्याच्या बॅटच्या किनाऱ्याला लागून स्लिपवर थांबलेल्या खेळाडूकडे गेले तरीदेखील तो आत्मविश्वासाने खेळत होता. फलंदीजी करताना राहुलची शैली कौतुकास्पद होती. तो त्याच्या शरीराजवळील चेंडू खेळण्यासाठी नेहमी तयारीत होता. ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूला त्याने खेळण्याचा प्रयत्न केला नाही.
बुमराहचे उत्तम प्रदर्शन
न्यूझीलंडविरुद्धच्या जागतीक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात बुमराह खराब फाॅर्मशी झगडत होता. त्याव्यतिरीक्त ऑस्ट्रेलिया दौरा आणि स्वदेशातील इंग्लंंडविरुद्धच्या मालिकेतही त्याचे प्रदर्शन खराब होते. मात्र, नॉटिंघम येथील इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये त्याच्या गोलंदाजीने फलंदाजांना हैराण केले. मागच्या काही सामन्यांपासून बुमराहचा याॅर्कर चेंडू फलंदाजांवर प्रभावशाली ठरत नव्हता. मात्र, पहिल्या कसोटीत इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात त्याचा याॅर्कर बरोबर टप्यात पडला आणि त्याने पूर्ण सामन्यात 9 विकेट्सची कमाई केली.
महत्त्वाच्या बातम्या-
कोच राहुल द्रविड बनले ‘कन्नड टिचर’, चक्क ब्रिटिश उच्चायुक्ताला दिले धडे; व्हिडिओ तूफान व्हायरल
आयपीएल २०२१: चौथ्या जेतेपदासाठी सीएसकेची तयारी सुरू, ऋतुराजसह ‘हे’ शिलेदार पोहोचले चेन्नईत
भारत विजयपथावर असताना पहिली कसोटी ड्रॉ; कोहली म्हणाला, ‘अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे की..’