भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताचा दिग्गज कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा याच्यासाठी हा त्याचा 100 वा कसोटी सामना आहे. शुक्रवारी अरुण जेटली स्टेडियमवर पाय टाकताच पुजाराने स्वतःचे 100 कसोटी सामने पूर्ण केले. पण रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळताना पुजारासोबत या सामन्यात चुकीचे वर्तन झाले, असे माजी दिग्गज गौतम गंभीर याला वाटते.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सध्या सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये भारता 1-0 अशा आघाडीवर आहे. चार सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना भारताने एक डाव आणि 132 धावांनी जिंकला होता. शुक्रवारी (17 फेब्रुवारी) सुरू झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक गमावली आणि प्रथम गोलंदाजी केली. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) स्वतःचा 100 वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. पण गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या मते रोहितने त्याला चुकीच्या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी उभे केले. गंभीरच्या मते पुजारासारख्या वरिष्ठ खेळाडूला शॉर्टवर (खेळपट्टीच्या अगदी जवळ) उभा करणे योग्य नव्हते.
क्रिकेटच्या सामन्यात शक्यतो नवख्या खेळाडूंना शॉर्टवर क्षेत्ररक्षणासाठी उभे केले जाते. पण रोहित शर्मा (Rohit Sharma) याने पुजाराला याठिकाणी उभा केल्यामुळे गंभीरने नाराजी व्यक्त केली. भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याविषयी म्हणाला की, “जो युवा आणि संघात नवीन असतो, त्याला याठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी उभे केले जाते. पुजाराच्या दोन्ही गुडघ्यांची सर्जरी झाली आहे आणि तो दीर्घकाळ खेळपट्टीवर फलंदाजीही करत असतो. अशात कर्णधाराने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे.”
“जो खेळाडू वरच्या फळीत फलंदाजीला उतरणार आहे, त्याला याठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी उभे करणे योग्य नाही, हे कर्णधाराने समजून घेतले पाहिजे. याठिकाणी खूप जास्त खाली वाकावे लागते. आणि त्यामुळे थकवा येतो. अशात शॉर्टवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला फलंदाजी करताना अडचण येते. त्याला अडचणीचा सामना करावा लागतो,” असेही गंभीर पुढे म्हणाला. (Gautam Gambhir fumed at Rohit Sharma for misplacing Cheteshwar Pujara, who is playing in his 100th Test, for fielding.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोहम्मद शमीचा दयाळूपणाने जिंकली चाहत्यांची मने! मैदानात घुसलेल्या चाहत्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल
आयपीएल 2023: असे आहे मुंबईच्या सामन्यांचे वेळापत्रक, यंदा सहाव्या विजेतेपदाचे आव्हान