मुंबई। रविवारी (१ मे) इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात ४५ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. हा सामना लखनऊ सुपर जायंट्सने ६ धावांनी जिंकला. लखनऊसाठी मोहसिन खान विजयाचा नायक ठरला. वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात त्याला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला. आता त्याचे लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीरने तोंडभरून कौतुक केले आहे.
लखनऊ सुपर जायंट्सने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला आहे की, मोहसिन खान (Mohsin Khan) याच्याकडे बराच आत्मविश्वास आहे आणि याचमुळे तो चांगली गोलंदाजी करतो.
रविवारी झालेल्या सामन्यात मोहसिन खानने ४ षटके गोलंदाजी करताना ४ च्या इकोनॉमी रेटने केवळ १६ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने दिल्लीचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर, कर्णधार रिषभ पंत यांना बाद केले होते. याचबरोबर त्याने एकाच षटकात अष्टपैलू रोवमन पॉवेल आणि शार्दुल ठाकूर या दोघांनाही बाद केले. त्यामुळे लखनऊने सामन्यात पुनरागमन करत विजय मिळण्यात यश मिळवले.
मोहसिनच्या या कामगिरीबद्दल गंभीरने कौतुक केले. तो म्हणाला, ‘मला वाटते की, केवळ एकच षटक नाही, तर त्याने ज्याप्रकारे त्याचा पूर्ण स्पेल टाकला तो खूप शानदार होता. त्याने जेव्हा १७ व्या षटकात रोवमन पॉवेल आणि शार्दुल ठाकूर यांच्या विकेट्स घेतल्या, तो सामन्याचा टर्निंग पाँइंट ठरला. या युवा खेळाडूकडे खूप आत्मविश्वास आहे आणि त्याचा त्याच्या कौशल्यावर पूर्ण विश्वास आहे. तो जर सातत्याने सुधारणा करत राहिला, तर तो लवकरच एक चांगला खेळाडू बनेल.’
Mentor sahab @GautamGambhir aur tareefon ki baarish, with special appreciation for @mohsin07khan's recent भौकाल. #AbApniBaariHai #IPL2022 🏆 #bhaukaalmachadenge #LucknowSuperGiants #TataIPL #LSG2022 pic.twitter.com/JXCqqw5mY0
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 2, 2022
२३ वर्षीय मोहसिन खानने याचवर्षी लखनऊ सुपर जायंट्सकडून (Lucknow Super Giants) २८ मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने आत्तापर्यंत ४ सामने खेळले असून ८ विकेट्स घेतल्या आहेत. यावेळी त्याची इकोनॉमी रेट ६.०७ इतका राहिला आहे.
तो देशांतर्गत क्रिकेट उत्तर प्रदेशकडून खेळतो. त्याने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत १ प्रथम श्रेणी सामना खेळला असून २ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने १७ अ दर्जाचे सामने खेळले आहेत. यात त्याने २६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर ३० टी२० सामने खेळले असून ४१ विकेट्स घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
आला आला, बांद्रा एक्सप्रेस आला! अर्जुनच्या पदार्पणाची चातकासारखी वाट पाहतायत चाहते, कधी मिळणार संधी?
पुण्यातील धोनीची लोकप्रियता पाहून भारावला निकोलस पूरन; म्हणाला, ‘मी कधीच विसरणार नाही…’
स्वत:ला दिलेल्या वचनाला जागला रिंकू सिंग; सामन्यापूर्वी हातावर लिहिली होती प्रेरणा देणारी ‘ही’ गोष्ट