भारतीय संघाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत श्रीलंका संघाला क्लीन स्वीप दिला आहे. भारतीय संघाने तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात श्रीलंका संघाची दाणादाण उडवली. रविवारी (दि. 15 जानेवारी) तिरुवनंतपुरम येथे पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने तब्बल 317 धावांनी विजय मिळवला. हा वनडे इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला. या मालिकेत दोन शतके झळकावणाऱ्या विराट कोहली याला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. मात्र, भारताचा माजी क्रिकेटपटू व समालोचक गौतम गंभीर याने हा पुरस्कार विभागून द्यायला हवा असे म्हटले.
तिसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याने भारतीय संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 110 चेंडूत 8 षटकार आणि 13 चौकारांचा पाऊस पाडत सर्वाधिक नाबाद 166 धावा कुटल्या. गुवाहाटी येथील पहिला सामन्यातही त्याने शतक साजरे केलेले. यामुळेच त्याला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. मात्र, त्यानंतर गंभीरने काहीसे वेगळे वक्तव्य केले. तो म्हणाला,
“विराटने दमदार कामगिरी केली यात वाद नाही. मात्र, मालिकावीर पुरस्कार माझ्यामते त्याच्यासह मोहम्मद सिराज याला विभागून द्यायला हवा होता. कारण, सिराजने मालिकेत अविश्वसनीय कामगिरी केली. त्याने तिन्ही सामन्यात डावाची दिशा ठरवली. तो अजून युवा आहे. यामुळे त्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. हा पुरस्कार विभागून द्यायला हरकत नाही.”
मोहम्मद सिराज या मालिकेत सर्वोत्तम गोलंदाज म्हणून समोर आला. त्याने पहिल्या सामन्यात दोन तर दुसऱ्या सामन्यात तीन बळी मिळवले. तिसऱ्या सामन्यात त्याने आपल्या गोलंदाजीची धार आणखी वाढवताना श्रीलंकेचे पहिले चार फलंदाज बाद केले. विशेष म्हणजे या तीन सामन्यात त्याची सरासरी केवळ 4 इतकी राहील.
(Gautam Gambhir Said Mohmmad Siraj Will Man Of The Series With Virat)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: विराटने धोनीच्या अंदाजात गाजवलं मैदान; ‘तो’ पॉवरफुल फटका मारताच समालोचकही म्हणाले, ‘माही शॉट’
सेंच्युरीनंतर विराटवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव, पण अनुष्काच्या पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष; म्हणाली…