---Advertisement---

युनिव्हर्स बॉस म्हणतोय,”मी जगातील सर्वोत्तम फलंदाज”; दिले ‘हे’ कारण

On: मंगळवार, मार्च 2, 2021 5:09 PM
---Advertisement---

जवळपास दोन वर्षाच्या कालावधीनंतर वेस्ट इंडीजचा दिग्गज आक्रमक फलंदाज ख्रिस गेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. श्रीलंकेविरुद्ध ३ मार्चपासून सुरु होणाऱ्या टी२० मालिकेतून तो पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय होईल. तत्पूर्वी, या मालिकेविषयी बोलताना गेलने आपण कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास सज्ज आहोत, असे म्हटले आहे.

टी२० मालिकेतून करणार पुनरागमन
‘युनिव्हर्स बॉस’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गेलने ऑगस्ट २०१९ मध्ये आपला अखेरचा वनडे सामना खेळला होता. त्यानंतर, तो एकाही आंतरराष्ट्रीय सामन्यात दिसला नाही. श्रीलंकेविरुद्ध ३ मार्चपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी आता त्याची वेस्ट इंडीज संघात निवड झाली आहे. या संघाचे नेतृत्व अनुभवी कायरन पोलार्ड करेल.

मी कोणत्याही स्थानी खेळण्यास सज्ज
या मालिकेआधी दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना गेल म्हणाला, “मी कोणत्याही स्थानी फलंदाजी करण्यास सज्ज आहे. मी फिरकी गोलंदाजांना तसेच वेगवान गोलंदाजांनाही चांगला खेळतो. माझ्यामध्ये कोणत्याही क्रमांकावर येऊन जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज बनण्याची क्षमता आहे. आयपीएलमध्ये अनिल कुंबळे यांनी मला हंगामाच्या सुरुवातीलाच, तू तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहेस असे सांगितल्याने मला तिसऱ्या क्रमांकावर खेळताना अडचण आली नाही.”

एक सलामीवीर म्हणून जगभरात नाव कमविणाऱ्या गेलला आयपीएल २०२० वेळी किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघ व्यवस्थापनाने तिसऱ्या स्थानी फलंदाजी करण्यास सांगितले. केएल राहुल व मयंक अगरवाल हेसलामीची भूमिका चोख बजावत असल्याने गेलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली होती. यानंतरही तो कमालीचा यशस्वी झाला होता.

या मुलाखतीत गेलने २०२१ टी२० विश्वचषक जिंकण्यास वेस्ट इंडिज संघ आतुर असल्याचे म्हटले आहे. सोबतच, कर्णधार कायरन पोलार्ड याचेदेखील त्याने कौतुक केले.

श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघ

कायरन पोलार्ड (कर्णधार), ख्रिस गेल, निकोलस पूरन, डॅरेन ब्राव्हो, शाय होप, जेसन होल्डर, फॅबियान ऍलन, अकील हुसेन, एविन लुईस, केविन सिंक्लेअर, रोमारीयो शेफर्ड, फिडेल एडवर्डस, आंद्रे फ्लेचर, ओबेद मेकॉय, लेन्डल सिमन्स, रॉवमन पॉवेल.

महत्त्वाच्या बातम्या –

भारत पुन्हा बुमराहविना उतरणार मैदानावर? ‘या’ मालिकेतून घेऊ शकतो माघार

आर अश्विनसह ‘या’ खेळाडूंना फेब्रुवारी महिन्यातील ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकन

अंडर १९ वर्ल्डकपचे ‘हे’ ५ हिरो टीम इंडियाकडून एखादा सामना खेळण्याची पाहताय वाट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---