सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश प्रीमियर लीग (Big Bash league) स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळत आहे. आतापर्यंत ही स्पर्धा व्यवस्थितरित्या पार पडली होती. दरम्यान कडक बायो बबल आणि नियमांचे काटेकोरपणे पालन होत अताना देखील या स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले आहे. स्पर्धेतील दिग्गज खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याला कोरोनाची लागण झाली आहे.
मेलबर्न स्टार्स (Melbourne stars) संघाने माहिती दिली आहे की, मेलबर्न स्टार्स संघाचा दिग्गज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याला कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी (३ जानेवारी) झालेल्या सामन्यात मेलबर्न स्टार्स संघाने मेलबर्न रेनेगड्स (Melbourne renegades) संघाविरुद्ध जोरदार विजय मिळवला होता. ज्यानंतर खेळाडूंची रॅपिड फायर चाचणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये ग्लेन मॅक्सवेलचा अहवाल पॉसिटीव्ह आला आहे.( Glenn Maxwell tests COVID 19 positive)
मेलबर्न स्टार्स संघाला या स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. या संघाने आतापर्यंत या स्पर्धेत एकूण ८ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना अवघ्या ३ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तसेच या स्पर्धेच्या गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं तर ८ संघांपैकी मेलबर्न स्टार्स संघ ७ व्या स्थानी आहे.
अधिक वाचा – बिग बॅश लीगमध्ये तब्बल ११ खेळाडू कोरोनाबाधित; स्पर्धेवर स्थगितीची टांगती तलवार
तब्बल १३ खेळाडूंना कोरोनाची लागण
ग्लेन मॅक्सवेल कोरोना पॉसिटीव्ह आल्यानंतर त्याला आईसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याची आरटी पीसीआर चाचणी येण्याची वाट पाहिली जात आहे. तर ग्लेन मॅक्सवेल सह तब्बल १२ खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मधील ८ सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा कठीण परिस्थितीत देखील मेलबर्न स्टार्स संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
ॲडम झांपा, मार्कस स्टॉइनिस आणि नाथन कुल्टर-नाईल यांच्यासह १० खेळाडूंचा सात दिवसांचा अनिवार्य कालावधी पुढील सामन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. कोरोनाच्या भीतीमुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने आपल्या खेळाडूंना मायदेशी बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या :
नेटकऱ्यांनी दिला रहाणेला ‘फेअरवेल’; सोशल मीडियावर व्हायरल होतायेत भन्नाट मीम्स
‘पालघर एक्सप्रेस’ सुसाट! सात बळी मिळवत जोहान्सबर्गमध्ये गाजवली सत्ता
हे नक्की पाहा : संघाला कठीण परिस्थितीतून सावरणारे ५ गोलंदाज