ऑस्ट्रेलिया संघाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल लवकरच बाबा होणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या क्रिकेटसोबतच आता त्याला आपल्या मुलाची जबाबदारीही उचलावी लागणार आहे. मॅक्सवेलची पत्नी विनी रमन ही भारतीय वंशाची आहे. भारतीय वंशाच्या विनीने भारतीय संस्कृतीप्रमाणे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पाडला. तिने आपल्या सोशल मीडियावर कार्यक्रमाचे फोटो शेअर करुन आनंद व्यक्त केला.
ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याची पत्नी विनी रमन () ही भारतीय वंशाची आहे. विनीने ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरीया येथील “मेंटॉन गर्ल्स कॉलेज” मध्ये तिने वैद्यकिय शिक्षण पुर्ण केले. जरी ती भारतीय वंशाची असली तरी विनीकडे ऑस्ट्रेलियाचे नागरीकतत्व देखील आहे. मॅक्सवेल आणि विनी 2013 साली ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न स्टारच्या एका कार्यक्रमात या दोघांची पहिली भेट झाली. त्यानंतर सात वर्षे दोघे एकमेंना डेट करत होते. सात वर्षांच्या दिर्घकाळानंतर 2020मध्येे या दोघांनी भारतीय संस्कृतीप्रमाणे साखरपुडा केला. नंतर आयपीयल 2022 सुरू होण्याआधीच 18 मार्च रोजी मॅक्सवेल आणि विनी दोघेही विवाह केला.
https://www.instagram.com/p/CvErzgsPg-P/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
मॅक्सवेल हा आपले लग्न आटपून भारतात आयपीयल 2022साठी आपल्या पत्नी सोबत आला होता. आयपीयल 2022चा पहिल्या सामन्यासाठी तो उपलब्ध नव्हता. पण याचा त्याच्या खेळावर काहीच परिणानम झाला नाही. त्याने आपल्या संघासाठी 13 सामन्यांमध्ये 169च्या स्ट्राइक रेटने 301 धावा केल्या. मॅक्सवेलच्या महत्वपूर्ण प्रदर्शनाच्या मदतीने “आरसीबी”ने आयपीयल 2022ला प्लेऑफमध्ये जागा मिळवली होती.
आयपीयल चालू असतानाच मॅक्सवेसलने आरसीबीच्या खेळाडूंना आपल्या लग्नाची पार्टी दिली होती. यात आरसीबी मधील सर्व खळाडू उपस्थित होते. विराट कोहली (Virat Kohli) आणि मॅक्सवेल यांची मैत्री ही किती घट्ट आहे हे सगळ्यांना माहित आहे. यामुळे विराटसह सर्वजनांनी नाचत मॅक्सवेसच्या पार्टीत चार चांद लावले होते.
महत्वाच्या बातम्या –
हरमनप्रीतच्या अडचणी वाढणार! बांगलादेशविरुद्धच्या गैरवर्तनासाठी मोजावी लागणार मोठी किंमत
पावसाने बिघडवले टीम इंडियाचे WTC समीकरण! पाकिस्तानचा झाला फायदा, पाहा क्रमवारी






