ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघांमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल. या मालिकेसाठी 11 महिन्यानंतर पुनरागमन करत असलेल्या जसप्रीत बुमराह याच्याकडे संघाचे नेतृत्व दिले आहे. असतानाच ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याने एक मोठे विधान केले आहे.
मागील वर्षी आयपीएलनंतर बुमराह दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर त्याने भारतीय संघासाठी क्रिकेट खेळले नाही. सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दोन सामने खेळल्यानंतर त्याची दुखापत पुन्हा चिघळली. त्यामुळे आशिया चषक व टी20 विश्वचषक या दोन महत्त्वाच्या स्पर्धा तो खेळू शकला नाही. यावर्षी देखील त्याने अद्याप एकही आंतरराष्ट्रीय व आयपीएल सामना खेळला नव्हता. त्यानंतर तो आता पुनरागमन करेल.
याच पार्श्वभूमीवर बोलताना मॅकग्रा याने त्याला एक सल्ला दिला. तो म्हणाला,
“जसप्रीत बुमराह एक गुणी गोलंदाज आहे. मला त्याला जास्त काळ खेळताना पाहायला आवडेल. त्याला आपली कारकीर्द आणखी मोठी करायची असल्यास एका प्रकारातून निवृत्ती घ्यावी लागेल. त्याच्या शरीराची सध्याची स्थिती पाहता हा निर्णय योग्य ठरेल.”
बुमराह कारगिलदीच्या सुरुवातीपासूनच सातत्याने दुखापतग्रस्त राहिला आहे. त्याची गोलंदाजी शैली त्यासाठी कारणीभूत असल्याचे अनेक जण म्हणतात. त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये निर्णायक भूमिका बजावली आहे. आगामी आशिया चषक तसेच भारतातच होणाऱ्या वनडे विश्वचषकात त्याच्याकडून भारतीय संघाला मोठ्या अपेक्षा असतील. विश्वचषकात तो मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज यांच्यासह भारतीय वेगवान गोलंदाजी विभागाची धुरा वाहताना दिसेल.
(Glenn McGrath Suggest Bumrah For Take Retirement From One Format)
महत्वाच्या बातम्या:
रिटायर झाल्यानंतर ब्रॉडने सांगितले सध्याच्या सर्वोत्तम गोलंदाजाचे नाव, म्हणाला, “त्याचा रनअपच भारी”
‘मी पुढील 2 महिन्यात…’, काऊंटी क्रिकेटमधून घेतलेल्या ब्रेकविषयी रहाणेचा मोठा खुलासा