नवी दिल्ली। भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली आपल्या स्पष्ट मतांसाठी ओळखला जातो. जेव्हा तो भारताचा कर्णधार होता, तेव्हा विरोधी संंघदेखील त्याच्याशी वाद घालण्याचे टाळत असायचे. दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज कर्णधार ग्रॅमी स्मिथनेही गांगुलीची प्रशंसा केली आहे. त्याने गांगुलीची प्रशंसा करत म्हटले की जर तुम्ही गांगुलीला त्रास दिला, तर तो नक्कीच प्रत्युत्तर देईल.
स्टार स्पोर्ट्सच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ कार्यक्रमात बोलताना स्मिथ (Graeme Smith) म्हणाला, “मी दादाबरोबर खूप वेळ घालविला आहे. आम्हा दोघांमध्ये फोनवरही चर्चा झाली आहे. तो नेहमी शांत असतो. तो मनमिळाऊ आहे आणि चांगल्या संवादासाठी नेहमीच तयार राहतो.” स्मिथने २००२ मध्ये नेटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विजयानंतर गांगुलीने जर्सी काढून हवेत फिरवत आनंद साजरा करणारे वाक्य आठवत म्हटले, “यावरून समजते की तो किती निर्भीड आहे. गांगुलीला असे करताना पाहून आनंद झाला होता. हे त्याच्यातील उत्कटता दर्शविते.”
“विशेष म्हणजे इंग्लंडमध्ये गांगुलीसाठी (Sourav Ganguly) भारताचा विजय किती महत्त्वपूर्ण होता, हे यावरून दिसून येते. तिथे नेटवेस्ट ट्रॉफीत मिळालेल्या आव्हानांचा सामना करणे त्याच्यासाठी महत्त्वाचे होते मायदेशाबाहेर जाऊन विजय मिळविल्यामुळे भारतीय क्रिकेटला एक नवी दिशा मिळाली. मला वाटते की ती एक खास घटना होती, ज्यामुळे आपण सर्वजण आज याची चर्चा करत आहोत,” असे स्मिथ पुढे म्हणाला.
“यावरून समजते की भारतीय संघासाठी तो विजय किती महत्त्वपूर्ण होता. इंग्लंडमध्ये नेटवेस्ट ट्रॉफीत (NatWest Trophy) इंग्लंडलाच पराभूत करणे मोठी गोष्ट होती,” असे नेटवेस्ट ट्रॉफीबद्दल बोलताना गांगुली म्हणाला.
स्मिथला २२ वर्षांच्या वयात २००३ मध्ये राष्ट्रीय संघाचा कर्णधार बनविले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-एकेवेळी ३ हजार रुपये महिना काम करणारा क्रिकेटर आता झालाय करोडपती
-जर धोनीला पटत नसेल तर देव देखील तुमची मदत करु शकत नव्हता…
-लग्नाच्या ११ वर्षानंतर भारतीय क्रिकेटरला मिळाली गुड न्यूज, झाला एका मुलीचा बाप