देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफी 2022-2023 चे उपांत्यपूर्व फेरीचे सामने सध्या खेळले जात आहेत. चौथ्या उपांत्यपूर्व फेरीचा सामन्यात गतविजेता मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश हे संघ इंदोर येथील होळकर स्टेडियमवर भिडतायेत. या सामन्यात आंध्र प्रदेशचा कर्णधार व भारताचा कसोटीपटू हनुमा विहारी याने कमालीच्या धैर्याचे प्रदर्शन करत, दुखापतीनंतरही मैदानावर उतरत सर्वांची मने जिंकली.
Sydney, 2021: Batted with an injured hamstring to save the Test match for India.
Indore, 2023: Batting left-handed with an injured wrist to guide Andhra Pradesh in a strong position.Hanuma Vihari never gives up 💪#HanumaVihari #AndhraPradesh #RanjiTrophy #Cricket pic.twitter.com/gDKKuKWluF
— Wisden India (@WisdenIndia) February 1, 2023
महाराष्ट्र व मुंबई यांच्यातील सामना आश्चर्यकारकरीत्या अनिर्णित राहिल्यानंतर आंध्र प्रदेश संघाला उपांत्यपूर्व फेरीत खेळण्याची संधी मिळाली. सामन्याच्या पहिल्याच दिवशी फलंदाजी करताना रिकी भुई व करण शिंदे यांच्या शतकांच्या जोरावर आंध्र प्रदेशने मोठी मजल मारली होती. मात्र, कर्णधार हनुमा विहारी उजव्या मनगटावर चेंडू लागल्याने रिटायर्ड हर्ट झाला होता. त्याचे मनगट फ्रॅक्चर असल्याचे नंतर समोर आले. मात्र, बुधवारी (1 फेब्रुवारी) संघाला गरज असताना तो पुन्हा एकदा मैदानावर उतरला.
संघाचा अखेरचा गडी बाद होणे शिल्लक असताना विहारी मैदानावर आला. मात्र, उजवा हात फ्रॅक्चर असल्याने त्याने डाव्या हाताने फलंदाजी केली. तो एका हाताने खेळताना दिसला. ललित मोहन याच्यासह त्याने 26 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत, संघाला 379 पर्यंत मजल मारून दिली. तो 27 धावा करून बाद झाला.
विहारी याने यापूर्वी देखील आपल्या अशाच धैर्याचे दर्शन घडवले होते. 2020-2021 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिडनी कसोटीत संघाला सामना वाचवणे गरजेचे असताना, त्याने धैर्याने ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांचा सामना केला होता. शरीरावर अनेक चेंडू झेलून, हाताला दुखापत होऊनही तसेच हॅमस्ट्रींगचा त्रास होत असतानाही त्याने तब्बल 161 चेंडू तग धरत, रविचंद्रन अश्विन याच्यासह हा सामना अनिर्णित राखला.
(Hanuma Vihari Play Left Handed After Broken Wrist In Ranji Trophy QF Against Madhya Pradesh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जड्डूच्या मित्राचा रणजीत धमाका; नवव्या क्रमांकावर बॅटिंग करत ठोकलं खणखणीत शतक
मोठी बातमी! आयपीएलच्या सर्वात महागड्या खेळाडूवर आयसीसीची मोठी कारवाई, धक्कादायक कारण आलं समोर