---Advertisement---

आयपीएलमध्ये हरभजन सिंगचा मोठा पराक्रम, या खास यादीत झाला समावेश

---Advertisement---

विशाखापट्टणम। आयपीएल 2019 मध्ये शुक्रवारी क्वॉलिफायर 2च्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सला 6 विकेट्सने पराभूत केले आणि आयपीएल 2019च्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. चेन्नई सुपर किंग्सचा हा आयपीएलमधील 8 वा अंतिम सामना असणार आहे.

चेन्नईने मिळवलेल्या या विजयाबरोबर त्यांचा अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगसाठीही हा सामना खास ठरला आहे. हरभजनने या सामन्यात दिल्लीचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला आणि अष्टपैलू क्रिकेटपटू शेरफेन रुदरफोर्डला बाद केले. याबरोबरच आयपीएलमध्ये 150 विकेट्स घेण्याचा टप्पाही पार केला.

रुदरफोर्डची विकेट ही हरभजनची आयपीएलमधील 150 वी विकेट ठरली. त्याने आयपीएलमध्ये 159 वा सामना खेळताना हा कारनामा केला आहे. त्यामुळे आता आयपीएलमध्ये 150 विकेट्स किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा हरभजन हा तिसरा भारतीय तर एकूण चौथा गोलंदाज ठरला आहे.

याआधी असा पराक्रम लसिथ मलिंगा, अमित मिश्रा, पियुष चावला या गोलंदाजांनी केला आहे. आय़पीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स मलिंगाच्या नावावर आहेत. त्याने आत्तापर्यंत 121 सामन्यात 169 विकेट्स घेतल्या आहेत.

हरभजनसाठी यावर्षीचा आयपीएल मोसमही चांगला ठरला आहे. त्याने या आयपीएल मोसमात चेन्नईकडून खेळताना 10 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज – 

169 विकेट्स – लसिथ मलिंगा

157 विकेट्स – अमित मिश्रा

150 विकेट्स – हरभजन सिंग 

150 विकेट्स – पियुष चावला

147 विकेट्स – ड्वेन ब्रावो

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली विरुद्धच्या विजयाबरोबरच केला हा खास कारनामा

रोहित, विराटला उचकवण्यासाठी केले असे, इशांत शर्माने केला खूलासा

रिषभ पंत या पिढीचा विरेंद्र सेहवाग, भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूने व्यक्त केले मत

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment