भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि श्रीसंत हे सध्या आशिया चषक पाहण्यासाठी आणि समालोचन करण्यासाठी दुबईत उपस्थित आहेत. आयपीएलच्या पहिल्या हंगामात दोघात वाद झाल्यानंतर, मागील काही काळापासून ते एकमेकांचे चांगले मित्र बनले आहेत. आता हरभजन ने त्याला थेट दुबईमध्ये गोल्फ शिकवण्याचा विडा उचललेला दिसून येतो.
पहिल्या आयपीएलमध्ये हरभजनने श्रीसंतच्या कानाखाली मारली होती. मात्र, त्यानंतर हरभजनने सार्वजनिकरित्या त्याची माफी मागितली होती व हे कृत्य रागाच्या भरात झाल्याचे कबूल केलेले. तसेच ते आता अधूनमधून भेटतही असतात. युएई येथे सुरू असलेल्या आशिया चषकातही त्या दोघांची भेट झाली. येथे चक्क हरभजनने श्रीसंतला बोल शिकवण्याचा प्रयत्न केला. श्रीसंतच्या इंस्टाग्राम हॅण्डलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यात हरभजन बोलताना दिसत आहे की, “एक भाई दुसरे भाई को सिखा रहा है”
श्रीसंत पहिल्या प्रयत्नात गोल्फ चेंडू मारण्यात अपयशी ठरतो. मात्र, दुसऱ्या वेळी तो चेंडू मारतो. त्यावेळी हरभजन मिडविकेटला मारला असे म्हणताना दिसत आहे.
https://www.instagram.com/reel/Ch2v73EjkK0/?igshid=YmMyMTA2M2Y=
आयपीएलच्या (Indian Premier League- IPL) पहिल्या हंगामात मोहाली येथे झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब या सामन्यात ही घटना घडली होती. यावेळी हरभजन मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) तर श्रीसंत किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळत होता. या प्रकरणानंतर हरभजनला त्या संपूर्ण हंगामात बंदी घातली. त्याचबरोबर पाच वनडे सामन्यातही त्याच्यावर बंदी आणली होती.
श्रीसंतने भारतीय संघाकडून खेळताना अनेक महत्वाच्या सामन्यात संघाला सामने जिंकून दिले आहे. भारताकडून २००७ टी२० विश्वचषक आणि २०११चा वनडे विश्वचषक विजयी संघात त्याचा समावेश होता. तसेच त्याने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि कोची टस्कर्स केरळ या संघाकडूनही सामने खेळले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाची चिंता वाढली, दुखापतीमुळे महत्वाचा अष्टपैलू संघातून बाहेर
आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात गोलंदाजाचा कहर! केवळ 9 धावा देताना ‘इतके’ बळी घेत रचलाय विक्रम
आठव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लॅक हॉक्स संघाला विजेतेपद