fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या चाहत्यांसाठी खुशखबर! लवकरच होणार…

Hardik Pandya and Natasa Stankovic Announce Their Pregnancy, See Pic

भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोव्हिक लवकरच माता पिता होणार असल्याची माहिती हार्दिक पंड्याने सोशल मीडियावर दिली आहे. त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या पत्नीबरोबरचे काही मनमोहक फोटो शेअर करत ही गुड न्यूज दिली आहे.

पंड्याने (Hardik Pandya) फोटो शेअर करत लिहिले की, “नताशा आणि मी दोघांनी मिळून एक चांगला प्रवास केला आहे. तसेच तो आणखी चालू राहील. आम्ही लवकरच आमच्या संसारात एका नवीन सदस्याचे स्वागत करण्यासाठी उत्साहित आहोत. आमच्या आयुष्याच्या या नवीन टप्प्यासाठी तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आमच्या सोबत असतील अशी आशा करतो.”

पंड्याने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याने नताशाच्या पोटावर हात ठेवला आहे. तसेच ती प्रेमाने त्याच्याकडे पाहत आहे. नताशाकडे पाहून ती गरोदर असल्याचे स्पष्ट होत आहे.

लॉकडाऊनमध्ये दोघे एकत्र राहत आहेत आणि पंड्याच्या या घोषणेने चाहत्यांची मने जिंकली आहे.

या नवीन वर्षाच्या सुरवातीलाच पंड्या आणि नताशाने (Natasa Stankovic) साखरपुडा केला होते. पंड्यासारखीच एक समान पोस्ट लिहून नताशाने तिच्या प्रेग्नन्सीची बातमी तिच्या चाहत्यांसोबतही शेअर केली आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-पाकिस्तानला घरी पाठविण्यासाठी टीम इंडिया जाणूनबुजून झाली पराभूत

-आयपीएलमध्ये फलंदाजांना रडकुंडीला आणणारे ६ भारतीय गोलंदाज

-खालच्या फळीत खेळणारे ३ खेळाडू, जे पुढे जाऊन बनले टीम इंडियाचे धुव्वांदार सलामीवीर

You might also like