भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या सध्या जास्तच चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे, पंड्या लवकरच वडील बनणार आहे. आपली होणारी पत्नी नताशा स्टेनकोव्हिकसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत स्वत: पंड्याने या गोष्टीची सर्वांना माहिती दिली आहे.
पंड्या आणि नताशा हे खूप महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते आणि अचानक यावर्षीच्या सुरुवातीला म्हणजे १ जानेवारीला त्यांनी साखरपुडा करत सर्वांना चकित केले. ३१ डिसेंबरच्या रात्री दोघांनीही सोबत नवीन वर्षाचा आनंद साजरा केला आणि दुसऱ्या दिवशी क्रूज पार्टीमध्ये पंड्याने नताशाला अंगठी घालत साखरपुडा केला.
यावरुन पंड्याची प्रेमकहाणी तर सर्वांना समजली. पण पंड्याची होणारी पत्नी ही नक्की आहे कोण? हे खूप कमी जणांना माहिती असेल. त्यामुळे या लेखात नताशाच्या काही विशेष गोष्टींविषयी माहिती देण्यात आली आहे.
तर पाहूयात…
Hardik Pandya Fiancee Life’s Some Important Things
वयाने पंड्यापेक्षा मोठी आहे नताशा
नताशाचा जन्म ४ मार्च १९९२ला झाला होता. तर, पंड्या ऑक्टोबर १९९३ ला जन्मला होता. म्हणजे नताशा पंड्यापेक्षा जवळपास दीड वर्षांनी मोठी आहे. ती सर्बियामधील प्रसिद्ध मॉडेल होती. परंतु, अभिनय क्षेत्रात आपली कारकिर्द घडवण्याच्या हेतूने नताशा २०१२मध्ये भारतात राहायला आली. तिने भारतातील वेगवेगळ्या प्रसिद्ध ब्रँडची मॉडेल म्हणून सुरुवात केली. त्यामुळे ती हळूहळू प्रसिद्ध होत गेली आणि तिला सत्याग्रह या बॉलिवूड चित्रपटात काम मिळाले.
बिग बॉस शोमुळे मिळाली लोकप्रियता
२०१४मध्ये नताशा रिऍलिटी शो बिग बॉसचा भाग होती. तिथून तिची लोकप्रियता अधिक वाढली. ती एक महिना बिग बॉस शोचा भाग असल्यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ होत गेली. इंस्टाग्रामवर आता तिचे १ लाखांपेक्षाही जास्त फॉलोवर्स आहेत. शिवाय, प्रसिद्ध गायक बादशाहच्या ‘बंदूक’ गाण्यात असल्यामुळे नताशा अजून नावारुपाला आली. एवढेच नाही तर, बादशाहच्या ‘डीजे वाले बाबू’ या गाण्यातील जबरदस्त नृत्यामुळे नताशाने एका रात्रीत मोठी प्रसिद्धी मिळवली.
शाहरुख खान आणि कॅटरीना कैफसोबत कॅमिओ
नताशाने अनेक बॉलिवूड गाण्यांमध्ये अभिनय केला आहे. त्यापैकी सर्वात विशेष म्हणजे तिला शाहरुख खान आणि कॅटरिना कैफच्या आवडीवर जिरो चित्रपटात कॅमिओ मिळाला होता. तसेच, शाहरुख आणि कॅटरिनाने मिळून २०१९मध्ये ‘द हॉलिडे’ नावाची एक वेब सीरिज काढली. त्यामध्ये नताशाने साराची भूमिका निभावली आहे. त्यात जोहर शर्मादेखील होता.
ट्रेंडिंग लेख-
क्रिकेटमधील ‘अशा’ वाईट घटनांचा धक्कादायक खुलासा गेलने कधी यापुर्वी नव्हता केला
माझा मृत्यू विमान अपघातात होईल आणि मी स्वर्गात जाईल; २ वर्षांनी बरोबर…
टेन्शनमध्ये आलेला बुमराह म्हणतो, ‘ती’ गोष्ट करणार नसाल तर…