भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) गेल्या काही महिन्यापासून आपल्या फिटनेसवर काम करतो आहे. दुखापतीमुळे त्याला क्रिकेटपासून दूरही राहावे लागले आहे. परंतु येत्या इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या (IPL 2022) पार्श्वभूमीवर तो लवकरात लवकर तंदुरुस्त होण्याच्या तयारीला लागला आहे. आगामी हंगामासाठी हार्दिकला नव्या अहमदाबाद संघाचा कर्णधार (Ahmedabad Captain) बनवले गेले आहे. त्याने या संघाला आपल्या फिटनेसबाबत अपडेट दिले (Hardik Pandya Fitness Update) आहेत.
हार्दिक आता पूर्वीपेक्षा जास्त चांगल्या स्थितीत असून तो येत्या काळात आपला अष्टपैलू खेळ लोकांना दाखवण्यासाठी उस्तुक असल्याचे त्याने सांगितले आहे.
व्हिडिओ पाहा- नेमका जॉन राईट आणि सेहवाग मध्ये वाद तरी काय होता?
२८ वर्षीय हार्दिक दीर्घ काळापासून दुखापतीचा सामना करतो आहे. दुखापतीमुळे टी२० विश्वचषकात त्याला संधी मिळूनही त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. अशामध्ये संघ निवडकर्त्यांनी त्याला बाकावर बसवत वेंकटेश अय्यरला आजमावून पाहणे योग्य समजले, जो आयपीएलमधील एक मातब्बर युवा वेगवान गोलंदाजी अष्टपैलू आहे.
अष्टपैलू म्हणून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे हार्दिक
‘बॅकस्टेज विथ बोरिया’ या शोमध्ये आपल्या दुखापतीविषयी बोलताना हार्दिक म्हणाला की, मी अष्टपैलूच्या रूपात संघाकडून खेळू इच्छित आहे. जर काही चुकीचे झाले असेल तर मला माहिती नाही की तसे का झाले. पण माझी पूर्ण तयारी ही अष्टपैलू म्हणून खेळण्याच्या दृष्टीने सुरू आहे. मला सध्या खूप चांगले वाटत आहे. आता येणारी वेळच सांगेल की, पुढे काय-काय घडेल.
अहमदाबादने हार्दिकबरोबर या खेळाडूंना केले करारबद्ध
हार्दिकने आयपीएलमध्ये यापूर्वी मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्त्व केले आहे. पण आता तो पहिल्यांदाच मुंबई व्यतिरिक्त दुसऱ्या संघाचे प्रतिनिधित्त्व करताना दिसणार आहे. इतकंच नाही, तर तो अहमदाबादच्या कर्णधाराच्या रुपात खेळणार आहे. असे असले तरी, हार्दिकला नेतृत्त्वाचा अनुभव नाही. त्यामुळे आता तो अहमदाबाद संघाचे नेतृत्त्व कशाप्रकारे करणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अहमदाबादने (Ahmedabad Team) हार्दिकव्यतिरिक्त युवा क्रिकेटपटू राशिद खान आणि शुबमन गिल यांनाही संघात स्थान दिले आहे. अहमदाबादने हार्दिक व राशिद यांना प्रत्येकी १५ कोटी, तसेच शुबमन गिलला ८ कोटी रकमेमध्ये करारबद्ध केले गेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नईयन एफसीचे मिशन ‘अव्वलस्थान’; बेंगलोरला नमवण्यासाठी आखलीय खास रणनीती
चहल आणि कुलदीप विराटपेक्षा जास्त धोनीचं ऐकायचे; दिनेशने सांगितले ‘कुलचा’च्या अपयशामागचे कारण
हेही पाहा-