गुरुवारी (१४ एप्रिल) राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सने ३७ धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर गुजरात संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आणि त्यांचा कर्णधार हार्दिक पंड्याचे कौतुक होऊ लागले. हार्दिकने सामन्यात सुरुवातीला फलंदाज आणि नंतर अप्रतिम क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले. याच पार्श्वभूमीवर गुजरात टायटन्सचा लेग स्पिनर राशिद खानने हार्दिक पंड्याच्या कौतुकात मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

अफगाणिस्तानचा दिग्गज फिरकी गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) याच्या मते कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) त्याच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर पुढे येऊन संघाचे चांगले नेतृत्व करत आहे. तसेच, हार्दिकने संघात एक चांगले वातावरण देखील तयार केले आहे. दरम्यान, ही पहिली वेळ आहे, जेव्हा हार्दिक एखाद्या आयपीएल संघाचे नेतृत्व करत आहे आणि यामध्ये यशस्वी होतानाही दिसत आहे.

राजस्थान रॉयल्सला धूळ चारल्यानंतर राशिद खान म्हणाला की, “ज्या पद्धतीने तो (हार्दिक पंड्या) संघाचे नेतृत्व करत आहे, ज्या पद्धतीने त्याने मैदानाच्या आत आणि बाहेर संघाचे वातावरण बनवले आहे, ते आतापर्यंत उत्तम राहिले आहे.”

राशिदच्या मते हार्दिक पंड्या धाडसी निर्णय घेताना घाबरत नाही. तो म्हणाला, “तो एक असा कर्णधार आहे, जो नेहमी धाडसी निर्णय घेतो. त्याला नेहमी विश्वास असतो आणि नेमके काय करायचे आहे, याविषयी देखील त्याचे मत स्पष्ट असते. एका कर्णधारासाठी हे खूप महत्वाचे असते. जेव्हा तुमची मनस्थिती स्पष्ट असते, तेव्हा तुम्ही योग्य निर्णय घेता आणि परिणाम आपोआप अनुकूल येतात.”

राशिदला वाटते की, योग्य वेळी योग्य निर्णय घेताना हार्दिकला यश येत आहे. “तुम्ही पूर्ण विश्वासासह योग्य निर्णय घेता, ही तीच गोष्ट आहे, जी त्याला सर्वश्रेष्ठ बनवते. त्याने आतापर्यंत स्वतःचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले आहे. मग फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण. प्रत्येक विभागात त्याने पुढे येऊन नेतृत्व केले आहे,” असे पुढे बोलताना राशिद म्हणाला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

दरम्यान, राजस्थान आणि गुजारत (RR vs GT) मधील या सामन्याचा विचार केला, तर राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने ४ विकेट्सच्या नुकसानावर १९२ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्स मर्यादित २० षटकांमध्ये ९ विकेट्सच्या नुकसानावर १५५ धावांपर्यंत पोहोचू शकला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

एकच तर हृदय आहे, कितीदा जिंकशील! चौकार मारल्यानंतर हार्दिकने गोलंदाज प्रसिद्धची मागितली क्षमा

“विराट-धोनीबद्दल सर्वजण चर्चा करतात, पण बुमराहनेही भारतासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे”

ब्रेकिंग! दोन वर्षांच्या बंदीनंतर IPLमध्ये कमबॅक केलेला केकेआरचा ‘हा’ गोलंदाज संपूर्ण हंगामातून बाहेर